शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोण होणार सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’चा विजेता?, विवियन डिसेनाचा पराभव करत ‘या’ स्पर्धकाचे नाव चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2025 | 12:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 Winner

कोण होणार सलमान खानच्या 'बिग बॉस १८'चा विजेता?, विवियन डिसेनाचा पराभव करत 'या' स्पर्धकाचे नाव चर्चेत

Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस १८’ सध्या चर्चेत आलं असल्याचं पाहायला मिळत आहे. हे सीझन सुरु झालं तेव्हापासून या सीझनची सर्वत्र चर्चा सुरु होती. यावेळी अनेक दिग्गज स्पर्धकांनी या शोमध्ये येऊन सर्वांचं भरपूर मनोरंजन केलं. हा शो आता हळूहळू अंतिम टप्प्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात विवियन डिसेना, करण वीर मेहरा, ईशा आणि एलिससारखे लोकप्रिय टीव्ही कलाकार दिसले. तर चाहत पांडे, अविनाश मिश्रा सारख्या स्टार्सनी या शोमुळे विशेष प्रसिद्धी मिळवली. आता या शोचा विजेता कोण होणार याविषयी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

प्रत्येकाला आपला आवडता स्पर्धक जिंकलेला पाहायचा असतो. आता Ormax Media चे रेटिंग आले आहे, त्यात टॉप ५ स्पर्धकांची नावे आहेत. ओरमॅक्स मीडियाच्या रेटिंगनुसार रजत दलाल पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. हे रेटिंग २८ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आहेत. रजत दलाल टॉप १० च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर विवियन डिसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. करवनीर मेहरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिल्पा शिरोडकर चौथ्या क्रमांकावर तर चाहत पांडे पाचव्या क्रमांकावर आहे.

आणखी वाचा – अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या चित्रपटाच्या इव्हेंटमधून परतताना दोन चाहत्यांचा मृत्यू, निर्मात्यांनी देऊ केली १० लाखांची मदत अन्…

याआधीच्या आठवड्याच्या (२१ डिसेंबर ते २७ डिसेंबर) रँकिंगमध्ये रजत दलाल पहिल्या क्रमांकावर, विवियन दुसऱ्या, करणवीर मेहरा तिसऱ्या, शिल्पा शिरोडकर चौथ्या आणि अविनाश मिश्रा पाचव्या क्रमांकावर होते. या शोचा विजेता कोण असेल याबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. पण रजत दलाल ज्या प्रकारे नंबर एकवर राहिला आहे आणि चाहते त्याला प्रेम देत आहेत. यावरुन चाहत्यांना नक्कीच तो विजेता बनलेला पाहायचा आहे.

आणखी वाचा – युजवेंद्र चहल व धनश्री वर्माच्या घटस्फोटाला ‘ती’ जबाबदार?, क्रिकेटरसह मिस्ट्री गर्ल हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली अन्…

या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच फॅमिली वीक पार पडला. यावेळी सर्वजण भावूक झाले होते. अभिनेत्री चाहत पांडेच्या आईची खूप चर्चा झाली. ती खूप स्पष्टपणे बोलताना दिसली. सलमान खानने अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांची चांगलीच शाळा घेतली. त्याने अविनाश मिश्रा यांना मुलगी-मुलगाही संबोधले.

Tags: bigg bossbigg boss 18 winnerrajat dalal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Bigg Boss 6 fame actress Sana Khan blessed with baby boy for the second time and she shared special video on social media

'बिग बॉस' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, व्हिडीओद्वारे व्यक्त केला आनंद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.