रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आठवणींनी झोळी भरली पण…”, ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, “माझ्या मर्यादा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2025 | 2:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
purva kaushik post

"आठवणींनी झोळी भरली पण…", ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, "माझ्या मर्यादा…"

purva kaushik post : मालिका या प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आजवर या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. एका ठराविक वेळेत या मालिका, मालिकेतील कलाकार पाहण्याची सवय झालेली असते. पण एका विशिष्ट कालावधीनंतर या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. त्यावेळी मात्र प्रेक्षकांचा हिरमोड होतो. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने मालिकेत ‘शिवा’ हे पात्र साकारलं होतं. आता मात्र शिवाचा हा प्रवास लवकरच संपणार आहे. मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होताना शिवाने म्हणजेच पूर्वाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने तिच्यासह साऱ्यांचे डोळे पाणावले.

शिवाने ही भावुक पोस्ट शेअर करत लिहिलं, “एक पर्व संपलं. ८ ऑगस्टला म्हणजे उद्या ‘शिवा’ मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट होईल. सगळंच भरुन आलं. खूप काही दिलंस गं शिवा. प्रेम, आपलेपणा, हक्क, कणखर असणं खूप काही, कसा प्रवास सुरु झाला हा आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो. ऑडिशन ते मालिका पूर्ण होईपर्यंतचा प्रवास खूप मोठा मजेशीर, कठीण, अनेक चढउतार असलेला, हिंमतीचा, संयमाचा होता. आता झोळी भरली आहे आठवणींनी. डोळे पाणावले आहेत पण मनात एक फक्त एक भावना आहे कृतज्ञता. तुझं रोखठोक आणि निर्भीड असणं माझ्या अंगात आहे. पण तुझ्यासारखा आत्मविश्वास आणि संयम ही माझ्यात असावा अस वाटतं. माझ्या या २ वर्षाच्या काळात प्रत्येक सुख दुःखात तू माझा आधार होतीस. बऱ्याचदा रडू आलं तेव्हा तेव्हा तू बरोबर होतीस आणि माझं मन हलकं केलंस. राग, रडणं, हसणं, मस्ती करणं सगळं तुझ्या पुढ्यात केलं”.

आणखी वाचा – “थांबण्याची वेळ…”, परदेशात असल्याने पुरस्कार स्वीकारायला पोहचू शकली नाही अमृता खानविलकर, भावुक होत म्हणाली, “मोठी जबाबदारी…”

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

पुढे तिने लिहिलं आहे की, “मला हक्काने सोबत केलीस. एवढा संयम कसा काय आहे तुझ्यात मला प्रश्नच पडतो बुवा पण अखेर या सगळ्यासाठी थँक यु म्हणाले तर रागवशील मला माहितीय पण थोडी भीती वाटतेच आहे. जातेस ना तू, शिफ्ट होतेस म्हणे, असो हे असं बोलणं होत राहील पण खूप थँक यु. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा. या प्रवासात आपण एकत्र घडत होतो. कधी तू मला ओरडायचीस कधी मी तुला जवळ घ्यायचे. असे आलो आपण एकत्र प्रवास करत. तू होतीस म्हणून सगळ्या गोष्टी अंगावर घेऊ शकले. खूप काही शिकवून चालली आहेस म्हणून थँक यु. या प्रवासादरम्यान बर्‍याच नवीन गोष्टींचा अनुभव मला घेता आला. माझ्यासाठी जणू एका पर्वतारोहण ( मोठा डोंगर चढण्यासारखा ) होता हा प्रवास, प्रत्येक fighting sequence एक नवीन आव्हान घेऊन यायचा”.

आणखी वाचा – रस्त्यांची अवस्था पाहून आस्ताद काळे पुन्हा भडकला, व्हिडीओद्वारे दाखविली परिस्थिती, म्हणाला, “आमच्या आयुष्याची किंमत…”

शेवटी पूर्वा म्हणाली, “तुझ्या या धैर्याने मला खऱ्या अर्थाने ताकदीचा अर्थ म्हणजे काय हे कळलं. संकटांना न घाबरता त्यांचा सामना करणं म्हणजे धैर्य असणे हे वाक्य तुझ्यामुळेच मी बोलू शकले. प्रत्येक मुलीच्या हृदयात असावं, असं हे धैर्य होतं आणि आहे तुझ्यात. अॅक्शन सीन शूट करताना माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे, पण प्रत्येक सीनमधून मी स्वतःला नव्याने शोधत गेले. या सगळ्याने मला माझ्या मर्यादा ओलांडायला शिकवलं. प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाने शिवा तुमच्या घराघरात पोहोचली. या कथेमुळे माझं तुमच्याशी एक अतुट नातं जोडलं गेलं आहे आणि हे नातं मी आयुष्यभर जपून ठेवेन. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मनाच्या एका कोपर्‍यात ही भावना नक्की आहे की हा शेवट नसून ही एका सुंदर प्रवासाची नवी सुरुवात आहे. मी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांची ऋणी राहीन. थँक यु”. पूर्वाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही तिचे कौतुक करत तिला धीर दिला आहे.

Tags: entertainmentmarathi actressPurva Kaushik
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
salman khan bodyguard shera

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचे निधन, ८८ व्या वर्षी कर्करोगाशी लढाई अपयशी, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.