रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 6:30 pm
in Lifestyle
Reading Time: 3 mins read
google-news
Yuvika Chaudhary Pregnancy

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

Yuvika Chaudhary Pregnancy : प्रिन्स नारुला आणि युविका चौधरी ही जोडी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. दोघांची प्रेमकथा चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही. प्रिन्स आणि युविका यांचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले आहे आणि लग्नाच्या सहा वर्षानंतर त्यांनी गोंडस अशा बाळाचे स्वागतही केले आहे. युविका आयव्हीएफच्या माध्यमातून आई बनली आहे. सध्या युविका तिचे आईपण एन्जॉय करताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या बाळाला विशेष वेळ देताना दिसत आहेत. अशातच अलीकडेच युवकाने तिच्या गरोदरपणाच्या कठीण प्रवासाबद्दल सांगितले आहे. तसेच, तिने नैसर्गिकरित्या प्रिन्सबरोबर का गर्भधारणा करु शकली नाही याबाबत उघड केले आहे.

नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत युविकाने तिच्या गर्भधारणेच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यास सक्षम न होण्यामागील कारण तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यानंतर तिने आयव्हीएफच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. नयनदीपशी बोलताना युविका म्हणाली की, आमच्या दोघांचे वेळापत्रक बरेच वेगळे होते. ओव्हुलेशन विंडो दरम्यान, आम्हा दोघांपैकी कोणी ना कोणी प्रवास करीत असायचो. जेव्हा आम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न केला, तेव्हाही तसे झाले नाही. मला वाटले की आम्हाला कोणाची तरी नजर लागली आहे.

आणखी वाचा – हगवणेंना पाठीशी घालणारा वकीलच आरोपी, तीन वर्षांपूर्वीच मारहाणीचा गुन्हा दाखल, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताच…

View this post on Instagram

A post shared by Yuvika chaudhary (@yuvikachaudhary)

युविका पुढे म्हणाली, “तिला आयव्हीएफबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा तिने अंडी गोठवण्याचा विचार केला तेव्हा त्याबाबत थोडीफार माहिती घेतली”. ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी मला घाबरवले. ते म्हणाले की मी आई होऊ शकत नाही. हे ऐकून मी पूर्णतः कोसळले. मी अस्वस्थ होते आणि रागाच्या भरात प्रिन्सला सांगितले की आपण बाळाचा विचार करत आहोत”. युविका पुढे म्हणाली की, “जेव्हा आम्ही दुसर्‍या डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी मला अंडी गोठवण्यास सांगितली. युविकाने त्याला सांगितले की हा तिचा प्रयत्न पहिला आणि शेवटचा असेल. या प्रक्रियेत बरीच इंजेक्शन आहेत. ज्यासाठी मी स्वत: ला तयार केले होते.

आणखी वाचा – “वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही”, हगवणेंचा वकील ट्रोल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “पुरावे दाखवून…”

वयाच्या ४१ व्या वर्षी झाली आई

युविकाची आयव्हीएफ प्रक्रिया ट्रायमध्ये आधीच यशस्वी झाली होती. प्रिन्सने स्वतःचा अहवाल वाचला होता. अहवाल वाचल्यानंतर त्याने रडण्यास सुरु वात केली. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता.

Tags: pregnancy problemswomenYuvika Chaudhary Pregnancy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Javed Akhtar Statement

"शबाना व मी रस्त्यावर झोपायचो…", जावेद अख्तर यांनी सांगितला 'तो' कठीण काळ, म्हणाले, "मुस्लिमांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.