Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. क्षणार्धात हे व्हिडीओ लाखोंचा टप्पा पार पाडताना दिसतात. बरेचदा अपघाताचे, गमतीशीर, आशयघन असे व्हिडीओ वाऱ्यासारखे सोशल मीडियावर पसरतात. बरेचदा जीवघेणे व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात, हे व्हिडीओ पाहण्यासारखे नसले तरी अधिक प्रमाणात हेच व्हिडीओ पाहिले जातात. हे घातपाताचे व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येतो. दरम्यान अनेक नेटकरी असे व्हिडीओ पाहून ट्रोलही करतात. आजवर अशा अनेक व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळालं आहे की, स्टंट करणं कित्येकांना भारी पडलं आहे. याने अनेकांचे जीवही घेतले आहेत. तरीदेखील, असे वागणाऱ्यांची आणि अशा जीवघेण्या व्हिडीओंची संख्या काही कमी झालेली नाही.
सोशल मीडियावर ट्रेंड हा आवर्जून फॉलो केला जातो. या ट्रेंडनुसार अनेकजण रील व्हिडीओ बनवून चाहत्यांसह शेअर करतात. अशातच एक रील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यांत एक महिला जंगलात योगा करताना दिसत आहे. अगदी जीव धोक्यात घालून योगा करतानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून कमेंटही करताना दिसत आहेत. योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जीव धोक्यात घालून योगा करण्याला काहीच महत्त्व नाही हे फार कमी जणांना माहित असेल.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, असं पाहायला मिळत आहे की, एका जंगलामध्ये लाकडाच्या पुलावर एक महिला योगा करताना दिसत आहे. यावेळी योगा करताना ती एक पाय वर करुन स्वतःला बॅलेन्स करण्याचं प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र हा योगाचा प्रकार त्या महिलेच्या जीवावर ओढवला आहे. अभिनेत्री योगाचा प्रकार करत असताना तिचा हात सटकतो आणि ती सरळ वाहत्या पाण्यात पडते. पूलही तसा जुना होताच, मात्र वाहत्या पाण्याच्या पुलावर योगा करणं सदर महिलेला भारी पडलं आहे.
हा व्हिडीओ @thebulletinx या सोशल अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरीही या व्हिडीओवर कमेंट करत या जीवघेण्या हल्ल्यावरुन त्या महिलेला सुनावत आहेत.