रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील अनुपस्थितीवर भावाचं भाष्य, बहिणीच्या सासरच्यांवर गंभीर आरोप, म्हणाला, “या लोकांशी संबंध…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Luv Sinha On sonakshi sinha wedding

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील अनुपस्थितीवर भावाचं भाष्य, बहिणीच्या सासरच्यांवर गंभीर आरोप, म्हणाला, "या लोकांशी संबंध..."

सोनाक्षी सिन्हा व झहीर खान यांच्या लग्नाला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला असून हे जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. मात्र, यादरम्यान अभिनेत्रीच्या भावाने पुन्हा एकदा या जोडप्याबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. जेव्हापासून सोनाक्षी व झहीरचे लग्न झाले आहे, तेव्हापासून अशा बातम्या येत आहेत की, अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा सोनाक्षी व झहीर यांच्या या नात्याबद्दल खूप नाराज आहे आणि जेव्हा त्याला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा लवने काही दिवसांचा वेळ मागितला होता. (Luv Sinha On sonakshi sinha wedding)

आता, बहिणीच्या लग्नाच्या सात दिवसानंतर, त्याने सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. लवने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, “मी यात सहभागी न होण्याचा निर्णय का घेतला? खोट्या आधारावर माझ्या विरोधात ऑनलाइन मोहीम चालवल्याने माझ्यासाठी माझे कुटुंब प्रथम येते हे सत्य बदलणार नाही”.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे…’ मालिकेचे १०० भाग पूर्ण, लीलाने शेअर केले एजेंबरोबरचे Unseen Photos, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

“With carefully curated news stories about his family business, nobody tread grey areas like the groom’s father’s proximity to a politician whose ED enquiries had vanished in the “washing machine”. Nor was there a whiff of the groom’s father’s stint in Dubai….”

— Luv S Sinha (@LuvSinha) June 30, 2024

या पोस्टनंतर चाहत्यांना असे वाटले की सिन्हा कुटुंबात सर्व काही ठीक आहे, परंतु काही दिवसांनंतर त्याने ट्विट करत याबाबतच स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्याने असं म्हटलं की, “बातमीसाठी त्याच्या फॅमिली बिझनेसची एक गोष्ट लिहिली गेली, ज्यामुळे त्यांच्या काळ्या बाजूकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही. जसे की वराच्या वडिलांची राजकारण्यांशी जवळीक, ज्यांची ईडी चौकशी ‘वॉशिंग मशीन’ मध्ये गायब झाली. तसेच वराचे वडील दुबईत राहतात याचीही कुणाला कल्पना नव्हती”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील टप्पू एका एपिसोडमागे किती कमावतो?, पहिल्या अभिनेत्यापेक्षा आहे अधिक मानधन, रक्कम तब्बल…

The reasons are very clear as to why I didn’t attend, and would not associate with some people no matter what. I’m glad a member of the media did their research instead of relying on creative stories being put out by a PR team.

— Luv S Sinha (@LuvSinha) July 1, 2024

या ट्विटनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने पुन्हा ट्विट केले, ज्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की,”मी यात का अडकलो नाही याची कारणे अगदी स्पष्ट आहेत आणि काहीही झाले तरी मी काही या लोकांशी संबंध ठेवणार नाही. मला आनंद आहे की माध्यमातील काही लोकांनी पीआर टीमने पसरवलेल्या काल्पनिक गोष्टींवर अवलंबून न राहता संशोधन केले”.

Tags: bollywood gossipentertainmentLuv Sinha On sonakshi sinha weddingluv sinha statementshatrughan sinha son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tula Shikvin Changalch Dhada fame Actor Hrishikesh Shelar shared special photos in his wrestling look.

"भावा कडक!", 'तुला शिकवीन...'मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, 'त्या' सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.