कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं वयाच्या ५८व्या वर्षी निधन झालं आहे. कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओ येथे त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अद्याप त्यांच्या या मृत्यूमागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. बऱ्याच कलाकार मंडळींनी शोक व्यक्त करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Nitin Desai Look)
नितीन देसाई यांनी माझा कट्टा वर दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बदलेल्या रूपाविषयी भाष्य केलं, यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, “तुमच्या बदललेल्या रूपड्याचा सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. ही काय भानगड आहे? तुम्ही अशी दाढी का वाढवताय? तुम्ही नवस वगैरे केला आहे का? नरेंद्र मोदी यांचं अनुकरण म्हणून करताय का? किंवा बाबुराव पेंटर यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे करताय का? आणि हे सगळं आताच का करताय?”
पाहा नितीन देसाई यांनी का वाढवली होती दाढी (Nitin Desai Look)

या प्रश्नांना उत्तर देत नितीन देसाई म्हणाले की, “काहीतरी आयुष्यात करत राहायचं हा ध्यास असल्यामुळे मी जेव्हा काहीच करू शकत नाही आहे. आपण लॉक डाऊन मुळे थोपले गेलो आहोत. तेव्हा मग मी काय केलं? माझे सगळे श्याम बेनेगल यांच्यापासून जेवढे दिग्दर्शक होते, त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. आणि त्यांच्याशी बोलता बोलता स्वतःला हरवत गेलो आणि दाढी वाढली. माझा मुलगा एलए (Los Angeles ) येथे राहतो. मग तो तिकडून म्हणाला की, बाबा दाढी मला येत नाही आहे, तुम्हाला आली आहे, छान वाटतेय. ती मग ठेवल्यानंतर काय झालं की, आताच जे सोशल मीडिया आहे, त्याचा मित्र दाढीकडे जास्त जाऊ लागला आहे.”
“पण मी असा कुठला नवस किंवा तप केलेला नाही आहे. मी काम करून विश्व निर्माण करणारा माणूस आहे”, असं नितीन देसाई म्हणाले होते.