Vicky Kaushal On Becoming Father : विकी कौशल आणि कतरिना कैफ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या एका लाडक्या मुलाचे पालक झाले. सध्या हे जोडपे पालकत्वाचा आनंद घेत आहे. अलीकडेच मुलाच्या जन्मानंतर विकी पहिल्यांदाच मुंबईबाहेर दिसला. दिल्लीतील एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. जिथे तो बाप बनण्याबद्दल आणि नवीन वडिलांच्या रुपात त्याच्या आयुष्याबद्दल बोलला. कार्यक्रमादरम्यान विकीला विचारण्यात आले की, अभिनय आणि नृत्यात प्रभुत्व मिळवल्यानंतर तो डायपर कसा बदलायचा हे देखील शिकला आहे का? या प्रश्नावर हसून अभिनेत्याने उत्तर दिले त्या उत्तराची चर्चा सुरु आहे.
एनडीटीव्हीला सांगितले की, “मी अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात चांगला आहे. मला एवढेच सांगायचे आहे”. वडील झाल्यावर होणाऱ्या भावनिक बदलांबद्दल बोलताना विकीने कबूल केले की त्याच्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच शहराबाहेर जाणे सोपे नव्हते. विकी म्हणाला, “पहिल्यांदा वडील झाल्यानंतर मी शहर सोडले आहे आणि हे खूप अवघड आहे. पण एक दिवस जेव्हा तो हे पाहील तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा अभिमान वाटेल. वडील होण्याचा अर्थ मी शब्दात व्यक्त करु शकत नाही”.
शुक्रवारी दिल्लीत झालेल्या एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर २०२५ समारंभात विकीला ॲक्टर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. विकी आणि कतरिनाचे ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे इंटिमेट ग्रँड लग्न झाले. लग्न होईपर्यंत त्यांनी आपले नाते गुप्त ठेवले. लग्नाच्या चार वर्षानंतर हे दाम्पत्य आता एका मुलाचे पालक झाले आहे.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध गायक, आनंद साजरा करत शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “आयुष्यात पुन्हा…”
विकी कौशलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ‘छावा’ हा २०२५ मध्ये भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक नाटकाने जगभरात ८०७ कोटी रुपयांची कमाई केली होती. विकी आता संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत. कतरिना शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटामध्ये दिसली होती.





