शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अवघ्या २ दिवसांत सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी ३’, तिसऱ्या पर्वात ‘हे’ स्पर्धक होणार सहभागी, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 12 mins read
google-news
Vadapav Girl, Dolly Chaiwala, and any other contestants will participate in the third season of Bigg Boss OTT see the details

अवघ्या २ दिवसांत सुरु होणार ‘बिग बॉस ओटीटी ३’, तिसऱ्या पर्वात ‘या’ स्पर्धकांचा असणार प्रवेश, जाणून घ्या...

मनोरंजन विश्वातला सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. टीव्हीवरील हा लो लोकप्रिय शो ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. अशातच या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सुरू होणार आहे. यावेळी सलमान खान नाही तर ‘झक्कास अभिनेता’ अनिल कपूर शो होस्ट करणार आहे. येत्या शुक्रवार, २१ जूनपासून या शोचे जिओ सिनेमावर स्ट्रीमिंग सुरु होणार आहे.

याआधी ‘बिग बॉस ओटीटी १’ करण जोहर तर, ‘बिग बॉस ओटीटी २’ सलमान खानने होस्ट केला होता. त्यानंतर आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ अभिनेता अनिल कपूर होस्ट करणार आहे. ‘टाइम्स नाऊ/टेली टॉक इंडिया’च्या वृत्तानुसार ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरामध्ये अनेक टीव्हीवरील कलाकारांसह काही युट्युबर्सचाही घरात प्रवेश होणार आहे. जाणून घ्या, या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत.

अंजुम फकीह : या अभिनेत्रीने ‘एक था राजा एक थी रानी’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. या मालिकांतील भूमिकांसाठी अंजु, फकीह खूपच प्रसिद्ध आहे. तिने साकारलेल्‌या अनेक भूमिकांनी या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशातच आता ती ‘बिग बॉस ओटीटी ३’द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

सोनम खान : सोनम ही एक मॉडल आहे जी बॉलीवूड आणि तेलुगु सिनेमांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. ती ज्येष्ठ अभिनेते मुराद यांची नात आहे. तिने  गोविंदा, चंकी पांडे, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, चिरंजीवी, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, राज बब्बर, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि नसीरुद्दीन शाह या अभिनेत्यांबरोबर अभिनय केला आहे. ती १९८७ ते १९९४ पर्यंत जवळपास ३५ हून अधिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. अशातच आता ती ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून अभिनेत्री जवळपास ४ दशकांनंतर टीव्हीवर येत आहे.

सना मकबुल : सना मकबुल खान टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि तिने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘विश’मधील डॉ. आलिया सन्याल या भूमिकेसाठी ती अधिक ओळखली जाते. तिने २०१४ मध्ये ‘डिक्कुठु चुडाकू रामय्या’ या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने ‘खतरों के खिलाडी ११’ मध्येदेखील भाग घेतला होता. यात ती ७व्या स्थानावर होती.

View this post on Instagram

A post shared by Sana Makbul (@divasana)

सना सुलतान : सना सुलतान ही एक अभिनेत्री आहे जी मुख्यतः तिच्या सुपरहिट संगीत व्हिडिओसाठी ओळखली जाते, ज्यात Sharry’s Dilwale, Kaka’s गुस्ताखी, बी प्राकचे रुहेदारियां आणि जेंझी बी आणि Milind Gaba’s Couple अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by SANA SULTAN超级巨星 🔱👑 (@sanakhan00)

वडापाव गर्ल उर्फ चंद्रिका गेरा दीक्षित : फूड व्लॉगर अमित जिंदालने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केल्यावर चंद्रिका दीक्षित चर्चेत आली. व्हिडिओने वडा पाव बनवण्याचे आणि विकण्याचे त्याचे कौशल्य दाखवले, ज्याने इंटरनेटवर खाद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियाच्या सामर्थ्याने त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले, ज्यामुळे त्याचे जीवन आणि व्यवसाय बदलला. यानंतर ती आता बिग बॉस ओटीटी ३मध्ये सहभागी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Chandrika Gera (@chandrika.dixit)

आणखी वाचा – रुपालीने अद्वैतवरच केला नवीन शक्तीचा वापर, नेत्रा गरोदर असल्याची माहिती अद्वैतच विरोचकापर्यंत पोहोचवणार, कुणाचा बळी जाणार?

मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूर : मॅक्सटर्नचे खरे नाव सागर ठाकूर असून तो यूट्यूबर आहे. बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव आणि त्याच्या ग्रुपच्या मारहाणीच्या घटनेनंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर यानंतर हे दोघे एकत्रही आले. अनेकांनी हे अनुमान लावले की, हा एक स्टंट आहे. या वादानंतर अवघ्या तीन दिवसांनी मॅक्सटर्न ए‌ल्विशच्या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला. अशातच आता तो बिग बॉस ओटीटी ३ मध्ये येत आहे.

डॉली चायवाला : डॉली चायवाल्याने त्याच्या अनोख्या चहा विकण्याच्या शैलीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नागपूरच्या जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ रस्त्याच्या कडेला असलेला त्याचा चहाचा स्टॉल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. डॉली चायवाल्याची दखल बिल गेट्सनेदेखील घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by D🫖LLY (@dolly_ki_tapri_nagpur)

आणखी वाचा – मेष, वृषभ व सिंह राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस धनलाभाचा, व्यवसाय व नोकरीत होणार बरकत, जाणून घ्या…

साई केतन राव : साई केतन् हाअ एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने टीव्हीवर अनेक मालिकांमधून काम केले आहे. तो नुकताच ‘इम्ली’ मालिकेमध्ये दिसला होता, यात त्याने अगस्त्याची भूमिका साकारताली होती. अभिनेता ‘मेहंदी है रचने वाली’ मालिकेमधील राघवच्या भूमिकेमुळे हा चांगलाच लोकप्रिय झाला. या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

Tags: Bigg Boss OTT 3Bigg Boss OTT 3 Marathi NewsBigg Boss OTT 3 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shraddha Kapoor On Relationship

श्रद्धा कपूरने राहुल मोदीबरोबरच्या प्रेमाची जाहीरपणे दिली कबुली, एकत्र फोटोही केला शेअर, म्हणाली, "माझं हृदय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.