सिनेसृष्टीतून ही कलाकारांच्या भांडण्याच्या बातम्या अधून-मधून समोर येत असतात. बरेचदा या भांडणांमुळे ही कलाकार मंडळी काम करणं टाळत मालिका सोडून देतात. जुन्या मालिकांमध्ये हे प्रमाण अधिक असलेलं पाहायला मिळालं. मालिकाविश्वातील अशा काही जोड्या आहेत ज्या ऑनस्क्रीन हिट झाल्या पण ऑफस्क्रीन त्यांच्यात अजिबात जमलं नाही. असं असलं तरी त्यांचे शो टीआरपीमध्ये अव्वल असले तरी त्यांच्यात वाद होत होते. आज त्या जोड्यांबद्दल जाणून घेऊयात. (Tv Celebs Hate Each Other In Real Life)
अक्षरा व नैतिक या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेमुळे ही जोडी चर्चेत आलेली पाहायला मिळाली. परंतु जेव्हा त्यांच्या खऱ्या आयुष्याबाबत बोललं जात तेव्हा ऑफस्क्रीन हे जोडपे एकमेकांशी जुळवू शकले नाही. त्यांनी सेटवर कधीच एकमेकांशी संवाद साधला नाही. कायमच त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच ‘बालिका वधू’ मालिकेतील जोडी पडद्यामागे कधीच एकमेकांशी चांगली वागली नाही. एका आऊटडोअर शूटदरम्यान या दोघांची मैत्री तुटली होती. मात्र त्यांनी त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ दिला नसला तरी त्यांनी एकत्र तालीमही केली नाही.

रिपोर्ट्सनुसार, ‘जोधा अकबर’च्या अकबर रजतला तो परीधीपेक्षा चांगला वाटत होता आणि दोघांमध्ये भांडण व्हायचे. तथापि, कलाकारांनी सेटवर व्यावसायिक नातेसंबंध राखले आणि कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता एकत्र काम केले. ‘हिटलर दीदी’मधील रतीला सुमित चिडखोर वाटला आणि तिने त्याच्यापासून अंतर राखणे पसंत केले. दुसरीकडे सुमितने रतीबरोबरच्या नात्याबाबत मौन बाळगले. ‘कैसी ये यारीया’ची लीड जोडी एकत्र कधीच पाहायला मिळाली नाही. त्यानंतर खरंतर, इतके मतभेद वाढले की पार्थने ही मालिका सोडली आणि सर्वांनाच धक्का दिला.

‘दिया और बाती हम’च्या मुख्य कलाकारांमध्ये इतका तणाव वाढला होता, जे एकेकाळी चांगले मित्र होते. दोघांमधील भांडणाच्या बातम्या आणि अफवा येत असल्या तरी, त्यांच्या भांडणाची खरी चर्चा रंगली ती म्हणजे दीपिकाला अनसने सेटवर अयोग्यरित्या स्पर्श केल्यानंतर कानाखाली मारली होती. देवांनाही भांडता येत असेल तर बाकी सगळे माणसंच आहेत. ‘देवों के देव…महादेव’ मधील शिव व पार्वती हे प्रणयाचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्यात गोष्टी इतक्या विस्कळीत झाल्या की सोनारिकाला बदलावे लागले.

विवियन व दृष्टी ‘मधुबाला एक इश्क एक जुनून’साठी प्रसिद्ध होते. पण अहंकारामुळे दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं नाही. खासकरुन जेव्हा विवियन शो सोडून पुन्हा परतला तेव्हा दोघांनी एकमेकांचा अधिक तिरस्कार केला. ‘ये है मोहब्बतें’च्या मुख्य भूमिकेतील जोडीमधील करणच्या आखडूपणामुळे व उशिरा येण्यामध्ये नेहमीच शीतयुद्ध सुरु राहिले. मात्र, दिव्यांकाच्या झालेल्या अपघातानंतर करणचा दृष्टीकोन चांगलाच बदलला आणि तो सुधारु लागला.