बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नावंही केलं जाहीर, आता मात्र अभिनयापासून आहे दूर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2026 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aashka goradia news

दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नावंही केलं जाहीर, आता मात्र अभिनयापासून आहे दूर

aashka goradia news : आशका गोराडिया ‘बिग बॉस 6’ मध्ये तिच्या उपस्थितीमुळे खूप चर्चेत आली. आता ती एक यशस्वी उद्योजक आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता मात्र अभिनेत्रीच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. तिने पती ब्रेंट गोबेलसोबत तिच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. दुस-यांदा आई-वडील झाल्यानंतर या जोडप्याने एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आशका गोराडियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची गोड बातमी शेअर केली आहे. त्यांनी एका बाळाचे स्वागत केले आहे. अभिनेत्री आशकानेही तिच्या मुलाचे नाव उघड केले आणि भावुक होत चिठ्ठीत लिहिले की, “1 मे 2026 रोजी आमच्या हृदयात असलेला आमचा मुलगा रिचर्ड थिओडोर गोबल आला. पुन्हा एकदा देवाच्या कार्यावर आमचा विश्वास वाढला. आम्हाला मिळालेल्या सर्व भेटवस्तू आणि चांगल्या बातम्यांसाठी देवाचे आभार”.

आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

या आनंदाच्या बातमीनंतर टीव्ही जगतातील अनेक कलाकारांनी कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याचे अभिनंदन केले. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने लिहिले, “तुम्हा दोघांचे अभिनंदन”. अभिनेत्री मौनी रॉयने हार्ट इमोजी शेअर केला आहे. याशिवाय अभिनेत्री सुरभी ज्योती, जेनिफर विंगेटसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन केले.

आणखी वाचा – सातवेळा IVF चा प्रयत्न, अनेक गर्भपात आणि…; लग्नाच्या १० वर्षांनी अभिनेत्री गरोदर पण सतावतेय बाळाची चिंता, म्हणाली…

अभिनेत्री आशका गोराडियाने 30 एप्रिल रोजी तिची दुसरी गर्भधारणा जाहीर केली होती. आशका गोराडिया आणि ब्रेंट गोबले 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले होते. या जोडप्याने 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, विल्यम अलेक्झांडरचे स्वागत केले. आशका गोराडियाने ‘कुसुम’, ‘लागी तुझसे लगन’ आणि ‘नागिन’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. सध्या तिने अभिनयाला अलविदा केला आहे. आशका गोराडिया एक उद्योजिका असून ती तिचा व्यवसाय सांभाळत आहे. ती पती ब्रेंट गोबेलसोबत गोव्यात राहते.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
summer fashion tips

उन्हाळ्यात कोणते कपडे वापराल?, ज्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल, हे पाच options जाणून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.