सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोटात ट्युमर, किडनी व हृदय विकाराचा आजार अन्…; राखी सावंतची प्रकृती गंभीर, पूर्वाश्रमीचा पती म्हणाला, “कॅन्सर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 16, 2024 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tumour discovered in Rakhi Sawants uterus

पोटात ट्युमर, किडनी व हृदय विकाराचा आजार अन्…; राखी सावंतची प्रकृती गंभीर, पूर्वाश्रमीचा पती म्हणाला, "कॅन्सर…"

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. राखीला काल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखीच्या पोटात व छातीत दुखत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या राखीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यानंतर आता राखी सावंतचा माजी पती रितेश सिंगने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. रितेशने सांगितले की, राखी सावंतला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. मात्र, डॉक्टरांकडून या गोष्टीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. (Tumour discovered in Rakhi Sawants uterus)

समोर आलेल्या अहवालानुसार राखीवर उपचार सुरु असून चाचण्या झाल्या आहेत. मात्र या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. रितेशने सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांना राखी सावंतच्या गर्भाशयात ट्युमर असल्याचे समजले. त्याची तपासणी डॉक्टर करत आहेत. राखी सावंत कॅन्सरने ग्रस्त असण्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर आली आहे. मात्र, डॉक्टर अजूनही तपास करत आहेत. डॉक्टरांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

आणखी वाचा – महीपतविरोधात चैतन्यकडे ठोस पुरावा, मधुभाऊंसाठी सायली व अर्जुन एकत्र राहणार का?, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतने मंगळवारी छाती व पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राखी सावंतच्या पोटात प्रचंड दुखत होते. त्यानंतर डॉक्टर तिची तपासणी करत आहेत. रितेशने ‘न्यूज१८’ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. राखी सावंत लवकर बरी व्हावी यासाठी रितेशने चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहनही केले आहे. रितेशने सांगितले की, “राखीने तिचे व्यक्तिमत्त्व असे बनवले आहे की तिला कोणीही गंभीरपणे घेत नाही. मात्र राखी सध्या संकटातून जात आहे”.

आणखी वाचा – “सहा महिने झाले आणि…”, आईच्या निधनानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “पाठीशी आहेस ना…”

‘बिग बॉस १५’मध्ये रितेश व राखी सहभागी झाले होते. इथून दोघांची मैत्री झाली. त्यांनतर रितेश व राखीचे लग्न झाले. तथापि, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि २०२२ मध्ये शो संपताच दोघेही वेगळे झाले. रितेशनंतर राखी सावंतने आदिल दुर्राणीसह लग्न केले. या लग्नाबाबतही अनेक बातम्या आल्या होत्या. आता रितेशने चाहत्यांना राखी सावंतसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

Tags: entertainmentrakhi sawantrakhi sawant healthTumour discovered in Rakhi Sawants uterus
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Paaru Serial New Promo

अहिल्यादेवींना भिडणार सूर्यकांत कदम, श्रीकांतला किडनॅप करुन खेळली चाल, प्रत्युत्तर देणार का?, नेमकं काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.