शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अक्षरा-अधिपतीचं वटपौर्णिमा स्पेशल भन्नाट गाणं, नवऱ्यासाठी घातली डिझाइनर नथ, मास्तरीण बाईंच्या दिलखेच अदावर सगळेच फिदा

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial Adhipati and Akshara's vatpaurnima special video shared on social media.

Video : अक्षरा-अधिपतीचं वटपौर्णिमा स्पेशल भन्नाट गाणं, नवऱ्यासाठी घातली डिझाइनर नथ, मास्तरीण बाईंच्या दिलखेच अदावर सगळेच फिदा

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्या प्रेमाचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षराने अधिपतीला प्रेमाची मागणी घातल्यानंतर दोघांमधील प्रेम अधिकच फुलत आहे. अशातच लवकरच वटपौर्णिमा येणार असून मालिकेतही अधिपती व अक्षरा यांची वटपौर्णिमा साजरी होणार आहे.

यंदाची वटपौर्णिमा अधिक्षरा म्हणजेच अधिपती व अक्षरा यांच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. यानिमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अधिपती व अक्षरा यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने त्यांचं ‘वटपौर्णिमा विशेष गाणं’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा!’ या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यासाठी अधिपती व अक्षराने खास लूक केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये टेबल पुसले, त्याच हॉटेलचा मालक आहे सुनील शेट्टी, अभिनेत्याने सांगितली त्याची संघर्ष कहाणी

या गाण्यासाठी अक्षराने गडद निळ्या रंगाची अन् त्याला लाल रंगाचा काठ असलेली नऊवारी साडी परिधान केली आहे. तर या साडीवर साजेसा असा साजशृंगारही केला आहे. तिने गळ्यात पारंपरिक भरजरी दागिने घातले आहेत. केसात गजरा, हातात हिरवा चुडा, मंगळसूत्राचं हटके पेडंट अशा खास लूकमध्ये अक्षरा खुपचग सुंदर दिसत आहे. तर, अधिपतीने गडद गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला असून या कुर्त्याला  सोनेरी रंगाची किनारही आहे. दोघेही ही लूकमध्ये अगदीच खास दिसत आहेत.

आणखी वाचा – Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, हळदीमध्ये फक्त ५० लोकांना एन्ट्री, काय असणार खास?

या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. गेले काही दिवस या दोघांमधील खास केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. अशातच या नवीन व्हिडीओमुळे चाहत्यांना आनंद झाला आहे, या व्हिडीओमधूनही अक्षराने पुन्हा एकदा अधिपतीला तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान, या व्हिडीओला सध्या प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ आवडल्याचेही म्हटले आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Saleel Kulkarni On Sameer Chaughule

'आयुष्यावर बोलू काही'च्या कार्यक्रमासाठी पोहोचले समीर चौघुले व 'तारक मेहता…'मधील भिडे, सलील कुलकर्णी म्हणाले, "हे दोघेही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.