छोट्या पड्यावरील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितीक्षा तावडे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने एकमेकांसह विवाहगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात केली आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाच्या तसेच लग्नापूर्वीच्या विधींचेही फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले पाहायला मिळाले. दोघांनी थेट केळवणाचा फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि त्यानंतर ते अखेर लग्नबंधनात अडकले. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते.
अभिनेत्री तितीक्षा तावडे युट्यूबवरही चांगलीच सक्रिय असते. युट्यूबवर व्लॉगद्वारे ती तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी तसेच कामानिमित्तचे व शूटिंगचे पडद्यामागचे काही किस्सेही शेअर करत असते. अशातच तिने नुकताच शेयर केलेला एक व्हिडीओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा सिद्धार्थसह अचानक प्लॅन केलेल्या एका ट्रीपवर गेली असून या ट्रीपचे काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
“रविवारच्या एका सकाळी मी व सिद्धार्थ अचानक प्लॅन झालेल्या एका ट्रीपवर जात आहोत” असं म्हणत अभिनेत्री तितीक्षा या व्हिडीओची सुरुवात करते. यापुढे ती “आम्ही पाहिल्यांदाच अशा नियोजनबद्ध असलेल्या ट्रीपवर जात आहोत. त्यामुळे आम्ही या ट्रीपसाठी खूपच उत्सुक आहोत.” असं म्हणते. यानंतर सिद्धार्थ “आम्ही खूप दिवसांपासून अशी एक ट्रीप करण्याचा विचार करत होतो. पण ते जमत नव्हतं पण आज अखेर तो दिवस आला आहे.” असं म्हणतो. या प्रवासादरम्यान हे दोघेही एकमेकांच्या आधीच्या ट्रीपचे काही किस्से व आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या भविष्यातील काही ट्रीपबद्दलही संभाषण करतानाचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
यापुढे ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर गाडीतच असलेल्या गॅसवर मॅगी व कोल्ड कॉफी बनवत त्यावर ताव मारतात. त्यांच्याकडे असलेल्या साधनसामुग्रीवर हे दोघे कोल्ड कॉफी व मॅगी बनवतात. हे पदार्थ तयार करतानाचा प्रत्येका क्षण त्यांनी या खास व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यानंतर या व्हिडीओच्या शेवटी “आणि शेवटी आम्ही दरीच्या बाजूला झाडाखाली सावलीत बसून मॅगीवर खात गप्पा मारत खूप दिवसांपासून पाहिलेलं एक छोटसं स्वप्न पूर्ण केलं” असं म्हणताना दिसत आहे.
दरम्यान, तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी “खूप छान, मस्त, भारी, तुमचा हा व्हिडीओ आवडला, तुमची जोडी खूपच आवडते” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.