गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भूषण-केतकीच्या चर्चित फोटोशूटचं रहस्य अखेर उलगडलं, ‘तू माझा किनारा’ नव्या चित्रपटातून येणार समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 22, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bhushan Pradhan New Work

भूषण-केतकीच्या चर्चित फोटोशूटचं रहस्य अखेर उलगडलं, ‘तू माझा किनारा' नव्या चित्रपटातून येणार समोर

Bhushan Pradhan New Work : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगळं कथानक प्रेक्षकांसमोर आणणारे चित्रपट येत असतात. आणि या आशयघन कथांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाचं नाव जोडले जाणार आहे. ‘तू माझा किनारा’, असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलेला भूषण प्रधान आणि तेलुगू, मल्याळम, हिंदी तसेच मराठी चित्रपटांमधून बहुआयामी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी केतकी नारायण आता प्रथमच एकत्र झळकणार आहेत. ही जोडी मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांच्या एकत्र फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधलं. त्यामुळं प्रेक्षकांमध्ये कुतूहल आणि थोडा गोंधळ निर्माण झाला होता. अनेकांना ते दोघं खऱ्या आयुष्यात एकत्र असल्याचं वाटलं. मात्र आता ‘तू माझा किनारा’च्या पोस्टर रिलीजमुळे या रहस्याचा उलगडा झाला आहे. तो फोटोशूट प्रत्यक्षात या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता.

आणखी वाचा – “ही मुलगी पुन्हा सेटवर दिसायला नको…”, जुई गडकरीला मालिकेतून दाखवलेला बाहेरच रस्ता, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

‘घरत गणपती’, ‘ऊन सावली’, ‘लग्न कल्लोळ’, ‘जुनं फर्निचर’ यांसारख्या चित्रपटांतून भूषण प्रधानने आपली वेगळी छाप सोडलेली आहे. तर केतकीने ‘युथ’, ‘उदाहरनार्थ नेमाडे’ असे मराठी चित्रपट, ‘अंडरवर्ल्ड’ आणि ‘विचित्रम’ असे मल्याळम चित्रपट, ‘फादर चिट्टी उमा कार्तिक’ तेलुगू चित्रपट आणि ‘८३’ सारखा हिंदी चित्रपट गाजवला आहे. तसेच तिने अनेक म्युझिक व्हिडीओ, शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा – जानकीने ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढलं आणि…; पलटवार की नवा डाव?, ‘घरोघरी…’ मालिकेत मोठा ट्विस्ट

चित्रपटाचं कथानक नेमकं काय आहे, हे अजून गूढच ठेवण्यात आलं आहे. पण इतकं नक्की हा सिनेमा प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श करणारा असून, साध्या वाटणाऱ्या आयुष्यातील असाधारण प्रश्न समोर आणणार आहे. ‘तू माझा किनारा’ फक्त पडद्यावर घडणारी कथा नाही, तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात कुठेतरी उमटणारा आरसा आहे. भूषण आणि केतकीची ही अनोखी जोडी नक्की कोणत्या रूपात दिसणार? त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये कोणते संघर्ष, कोणते शोध लपले आहेत? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘तू माझा किनारा’ मध्ये. हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देईल, एवढं मात्र निश्चित.

Tags: bhushan pradhanketaki narayanmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
kumar sanu first wife allegations

घरात कोंडून ठेवायचे, जेवणही लपवायचे आणि…; कुमार सानूकडून मिळालेल्या वागणुकीवर पूर्वाश्रमीची पत्नी स्पष्टच बोलली, म्हणाली, "गरोदर असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.