शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सगळ्यांचं म्हणणं आहे लग्न कर आणि”…; डोक्याला बाशिंग बांधून जुई गडकरीचा व्हिडीओ व्हायरल, नवरीबाई नटली कारण…

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 21, 2024 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag serial fame actress Jui Gadkari wedding look video viral on social media

जुई गडकरीने डोक्याला बाशिंग बांधल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा आणि गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करून जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून जुईला लोकप्रियता मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून झळकत असून तिने या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारली आहे. जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. (Jui Gadkari Wedding Look)

अशातच जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. जुईने शेअर केलेला हा व्हिडीओ जुना आहे. पण तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये प्रतिमा सायलीच्या डोक्याला बाशिंग बांधत आहे. दोघीही या व्हिडीओमध्ये मजामस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा असून या व्हिडीओमधून दोघींमधील ऑफस्क्रीन बॉण्ड पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओखाली मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची घेतली भेट, घरी बोलवत केला विशेष पाहुणचार, दिली ‘ही’ खास भेटवस्तू

या व्हिडीओबरोबर जुईने असं म्हटलं आहे की, “उतावीळ आई be like! सगळ्यांचं म्हणणं हेच! की बाई लवकर लग्न कर आणि हीच इच्छा मी व्यक्त करत आहे”. तसंच हा व्हिडीओ जुना असल्याचेही जुईने सांगितले आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “छान व्हिडिओ”, “व्वा ताई तुझी स्माईल खुप छान आहे”, “जुई ताई ज्या घरची सुन होईल त्या घरचे सोने होईल”, “शुभ मुहूर्तावर, शुभमंगल लवकरच”, “तुम्ही ज्या घरी जाणार, ते घर सुखाने भरभरून जाणार” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी जुईच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – निवेदिता सराफ व मंगेश देसाई यांच्या नवीन मालिकेची वेळ जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ मालिकेत सोज्वळ व साध्या सुनेची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. आता सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Tags: jui gadkariJui Gadkari NewsTharla Tar Mag Fame Jui Gadkari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Celebrity Celebrating Karwa Chauth

Photos : डिझाइनर साड्या, पारंपरिक लूक अन्…; बॉलिवूड अभिनेत्रींचं हटके करवा चौथ सेलिब्रेशन, जपली परंपरा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.