शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, शेअर केला खास व्हिडीओ, कौतुकाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 28, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag serial fame actress Jui Gadkari shared a special video of her visit to an orphanage in Shantivan see the details

अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा स्तुत्य उपक्रम, शांतिवनला भेट दिल्याचा खास व्हिडीओ केला शेअर

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी तिच्या या मालिकेतील सायली या पात्रामुळे नेहमीच चर्चेत आली आहे. सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी असून, या मालिकेविषयीच्या विविध अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करते. जुई अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच सामाजिक भानही जपते आणि याच सामाजिक भानामुळे जुई इतरांपेक्षा वेगळी ठरते. जुई गेली अनेक वर्षे आश्रमात जाऊन कुष्ठरोगाशी झुंज देणाऱ्या व अनाथ वृद्धांना मदत करते. गेली १९-२० वर्षे ती हा उपक्रम करत आहे. येत्या दिवाळीतदेखील ती हा उपक्रम करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार तिने या उपक्रमाला सुरुवात केली असून याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Jui Gadkari Orphanage Visit)

जुईने २७ ऑक्टोबर रविवार रोजी शांतिवनमधील अनाथाश्रमाला भेट देत दिवाळीच्या तिच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. यावेळी तिने सर्वांशी प्रेमाने संवाद साधला. तसंच स्वत:च्या हाताने त्यांना काही भेटवस्तुही दिल्या. यावेळी  अनाथाश्रमातील अनेक आजी-आजोबांनी जुईचे कौतुक केले. तसंच जुईनेदेखील सर्वांशी मनमुरादपणे गप्पा मारल्या त्याचबरोबर जुईने यावेळी सर्वांसाठी खास गाणेही गायले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे गाणं गात तिने उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी जुईसह तिचे अनेक सहकारीदेखील या व्हिडीओमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by tharal_tar_mag_ (@tharal_tar_mag_)

आणखी वाचा – “ठाणे महानगरपालिका झोपेच्या शोधात”, कचरा प्रकरणी शशांक केतकरची पुन्हा एकदा पोस्ट, सत्य परिस्थिती दाखवत म्हणाला, “देश असाच घाण…”  

जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शांतिवन आश्रमाची पूर्ण झलक पाहायला मिळत आहे. जुईच्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे या स्तुत्य उपक्रमानिमित्त कौतुक केले आहे. “चांगले काम करत आहेस ताई त्यामुळे तू मला खूप आवडते. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊदेत. श्री स्वामी समर्थ”, “मस्त ताई एक चांगली कलाकर झाली पण आपले पाय तू जमिनीवर ठेवले आहेस, खूपच छान”, “रीलमधल्या आश्रम संस्थेतील तुझा वावर जितका लोकप्रिय, तितकेच किंबहुना जास्त वंदनीय आणि आदरणीय रीअल लाईफ आश्रमातील हे असे कार्य”, “तुम्ही खूप ग्रेट काम करत आहात” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी जुईचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा – सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार मिळताच प्रसादसाठी अमृताची खास पोस्ट, म्हणाली, “‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जुईने हा उपक्रम करणार असल्याचे सांगत याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी तिने “शांतिवन, नेरे या ठिकाणी जाण्याचे माझे हे साधारण १९-२० वे वर्ष आहे. तिथे जाऊन आम्ही कुष्ठरोगी आणि निराधार आजी-आजोबांबरोबर एक दिवस साजरा करतो. यात कुणाला मदत करायची असेल तर मला कळवा” असं म्हटलं होतं.    

Tags: jui gadkariJui Gadkari Orphanage Visitmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
mirzapur the film announment

'मिर्झापूर' वेबसीरिजवर आता चित्रपट येणार, टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.