बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’मधील सायलीचा अपघात, सर्जरी झाल्यानंतर सुरु केलं शूट, म्हणाली, “या दिवसांमध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 1, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag fame Sayali aka Actress Jui Gadkari revealed that she underwent eardrum surgery shared the video

डाव्या कानाचा पडदा फाटला अन्...; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितले तिच्यावरील शस्त्रक्रियेचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असते. मालिकेतील सायली-अर्जुन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली आहे. आपल्या निरागस अभिनयाने सायली फेम जुईने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जुईने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे अनेक चाहते मंडळी चिंतेत होते. अभिनेत्रीला नेमकं काय झालं आहे? याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते. मात्र तिला काय झालं आहे? हे नेमकं कुणालाच माहीत नव्हतं. आजारी असताना जुईने एक फोटो शेअर करत ‘लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन’ असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे. (Jui Gadkari Ear Surgery)

जुईने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “हॅलो.. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ करत आहे. सगळे मला विचारत होते काय झालं होतं? तर जुलैमध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं. मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे ऐकूसुद्धा येत नव्हतं. त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो. कारण पडदा आपोआप बरा होतो. आम्ही खूप वाट बघितली पण तो काही बरा झाला नाही. त्यामुळे मग सर्जरी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता तो त्यासाठीच होता. यासाठी आम्ही मालिकेचे कथानक वगैरे सांभाळून घेतलं आणि मग मी पाच दिवसांसाठी सुट्टीवर गेले”.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील सर्व सदस्यांना बसणार शॉक, पण नेमकं झालं तरी काय? पहा हा खास प्रोमो

यापुढे जुई असं म्हणाली की, “पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंगला आलेली आहे आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप पाठींबा दिला. कारण तेव्हा माझ्या काही सहकलाकारांनादेखील बरं वाटत नव्हतं. पण आम्ही आमच्या एपिसोड्सची बँक बनवली होती. मालिकेचे कथानक वगैरे  त्यानुसार सांभाळलं आणि त्यामुळेच प्रियाने मला ढकललं. मात्र, आता पुढचे काही दिवस काळजी घ्यायची आहे. सर्जरीच्या दरम्यान, चॅनलनेसुद्धा मला खूप पाठींबा दिला आणि सांभाळून घेतलं. तसंच प्रोडक्शन टीमनेही सांभाळून घेतलं”.

आणखी वाचा – 01 September Horoscope : कन्या व तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस स्वप्नपूर्तीचा, बाकीच्या लोकांच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

तसंच यापुढे जुईने असं म्हटलं की, “आता मी बरी होत असून तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी हळूहळू आता बरी होत आहे! कृपया ठ’रलं तर मग’च्या थांबलेल्या शूटबद्दल काही युट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या बनावट व्हिडीओंवर विश्वास ठेवू नका. मालिकेवर असंच प्रेम करत रहा आणि सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता रोज ही मालिका बघत रहा”.  

Tags: jui gadkariJui Gadkari eardrum surgery Marathi newsTharla Tar Mag fame Sayali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Riteish Deshmukh shouts to Ankita Walawalkar for pulling Ghanshyam Darawade in the task

Bigg Boss Marathi : "घन:श्यामबरोबर केलं तेच जर...", 'त्या' कृतीबद्दल रितेशने अंकिता वालावलकरला चांगलंच झापलं, म्हणाला, "फार चुकीचं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.