मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुनच्या हाती लागले महिपतविरुद्धचे पुरावे, आता साक्षीचा पर्दाफाश होणार का?, ‘ठरलं तर मग’ला रंजक वळण

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharala Tar Mag serial update the evidence against Mahipat is in the hands of Sayali and Arjun

सायली-अर्जुनच्या हाती लागले महिपतविरुद्धचे पुरावे, आता साक्षीचा पर्दाफाश होणार का?, ‘ठरलं तर मग’ला रंजक वळण

‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही एपिसोडपासून सायली-अर्जुन यांच्यामधील दुरावा पाहायला मिळतो आहे. हा ट्रॅक संपल्यानंतर सायली-अर्जुन असा निर्णय घेणार आहेत की, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी ते परस्पर सहमतीने एकत्र राहतील.  अर्जुनने सायलीला सुभेदारांच्या घरीच राहण्याची विचारणा केल्याबद्दलचा प्रोमोही काही दिवसांपूर्वी समोर आलेला. यावर अर्जुनने सायलीला मधुभाऊंना जेलमधून सोडवून आणेपर्यंत आपण एकत्र राहू असं म्हटलं होतं. त्यामुळे ते दोघे मिळून आता मधूभाऊंना सोडवण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत.

अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात तापातून बरं वाटल्यामुळे अर्जुन सायलीला स्वयंपाकघरात मदत करतानाचे पाहायला मिळाले. सर्व सुभेदार कुटुंबियांना अर्जुन स्वतःच्या हाताने नाश्ता वाढतो. तर दुसरीकडे महीपतकडे मोबाईल आहे हे मधुभाऊ बघतात आणि हवालदार शेवडेंना सांगतात. हवालदार शेवडे महीपतला मोबाईल नीट ठेवायला सांगतो, त्यावर महीपत मधुभाऊंचा कार्यक्रम उरकायची भाषा करतो.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – “आज बाबा नाहीत पण…”, वडिलांच्या निधनानंतरचा प्रसंग सांगाताना गौरव मोरेचे पाणावले होते डोळे, म्हणालेला, “त्यांची इच्छा…”

तर दुसरीकडे अर्जुन-सायली मधुभाऊंना भेटायला जेलमध्ये येतात. मधुभाऊ महीपतकडे मोबाईल बघितला असून ते हवालदार शेवडेंना सांगितल्याचं अर्जुन सायलीच्या कानावर घालतात. अर्जुन मधुभाऊंना महीपतकडे मोबाईल आहे म्हणजे साक्षी बाहेरून त्याला मदत करत आहे असं सांगून सावध करतो. तर एकीकडे चैतन्य घरात साक्षी नसून पुरावे शोधता येतील असं अर्जुनला फोनवर कळवतो, त्यावर अर्जुनही लगेच सायलीला घेऊन येत असल्याचा होकार कळवतो.

आणखी वाचा – नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा अंत, शक्तीही कामी येईना अन्..; शेखर राजाध्यक्षने दिला अंताचा इशारा

अर्जुन-सायली महीपतच्या घरी चैतन्यला भेटून लगेच पुरावे वेगवेगळ्या खोलीत शोधू लागतात. दुसरीकडे साक्षी महीपतला जेलमध्ये भेटून अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल माहिती देते. तर इथे अर्जुन, सायली व चैतन्य महीपतच्या घरी पुराव्यांचा शोध सुरूच ठेवतात. त्यामुळे आता पुढील भागात चैतन्य अर्जुन-सायलीला मधु भाऊंच्या केसबद्दलचे साक्षीविरोधातले अत्यंत महत्वाचे पुरावे दाखवतो आणि त्यावर अर्जुन साक्षीचा पर्दाफाश करण्याचं ठरवतो.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsTharala tar mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

usha Nadkarni ankita lokhande
Entertainment

“मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्…

जून 3, 2025 | 1:34 pm
Beed Female Sugarcane Workers Women
Women

धक्कादायक! ऊसतोडीला जाण्यापूर्वी हजारो महिलांनी गर्भपिशवीच काढली, भयाण सत्य समोर

जून 3, 2025 | 1:29 pm
Hollywood Actor Jonathan Joss death
Entertainment

ज्येष्ठ अभिनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, याच वर्षी केलं होतं लग्न, हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर

जून 3, 2025 | 12:28 pm
Sankarshan karhade viral post
Entertainment

“तुझ्या लग्नात हुंडा मागू पण…”, लग्नापूर्वीच संकर्षण कऱ्हाडेला वडिलांनी सांगितलेली ‘ती’ गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला…

जून 3, 2025 | 12:03 pm
Next Post
Aishwarya Narkar shared a special video and showed a glimpse of the home-stay in Pachagani.

Video : पाचगणीत गेल्यावर नवऱ्यासह 'या' ठिकाणी राहत आहेत ऐश्वर्या नारकर, निसर्गाच्या सानिध्यात रमल्या अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.