शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जर अभिनेत्री नसती तर?…”, चाहत्याचा जुई गडकरीला थेट प्रश्न, जुई उत्तर देत म्हणाली, “मोठ्या ब्रँडमध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala tar mag serial fame Jui Gadkari answered the question of a fan if she was not an actress

जुई गडकरीने चाहत्याच्या “जर अभिनेत्री नसती तर?” या प्रश्नाचे दिलं उत्तर

अभिनय क्षेत्रात ‘पुढचं पाऊल’ टाकताच यशस्वी झालेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे मनोरंबजन क्षेत्रात प्रवेश करताच जुईला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहेच, पण अभिनयात उत्तम असणारी जुई शिक्षणातही हुशार होती आणि याबद्दल तिने स्वत:चा अनेकदा भाष्य केलं आहे. जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising या विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे.   (jui gadkari answered fan question)

अभिनयासह तिचा शिक्षणातील व्यासंग अधिक आहे. जुई २००९ मध्ये मुंबई विद्यापीठाची टॉपरही होती. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली आहे. त्यामुळे जुई जर अभिनेत्री नसती तर? तर ती नोकरीच्या क्षेत्रातही तितकीच यशस्वी झाली असती. असं म्हणायला हरकत नाही. जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. 

आणखी वाचा – दिस सरले! हेमंत ढोमे-क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना Unseen Video व्हायरल, म्हणाला, “आमचं प्रेम…”

अशातच २०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ केलं होतं. यात तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारळे होते. यावेळी एका चाहत्याने तिला “जुई गडकरी जर अभिनेत्री नसती तर कोण असती?” असा हटके प्रश्न विचारला होता. यावर जुईने चाहत्याला असं उत्तर दिल होतं की, “जर मी अभिनेत्री नसते तर आज कोणत्या तरी मोठ्या ब्रँडमध्ये ब्रँड-हेड किंवा ब्रँड-मॅनेजर या पदावर असते. जाहिरात आणि मार्केटिंगवर माझे खूप आणि खरे आहे”.

आणखी वाचा – प्राजक्ता माळी प्रकरणी धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया का दिली नाही?, सुप्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मंत्री महोदय म्हणून…”

दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेतील तिची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

Tags: jui gadkarijui gadkari answered fan questiontharala tar mag serial fame jui gadkari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
06 january 2024 daily horoscope Aries, Taurus, Gemini people may get financial benefits on Monday

06 January Horoscope : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांना सोमवारी आर्थिक लाभाची शक्यता, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.