अभिनेत्री अनीता हंसनंदानी सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिने साकारलेली नकारात्मक भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली. तसेच रोहित रेड्डीबरोबर लग्नबंधनात अडकली असून तिला एक मुलगादेखील आहे. अनीता एका पॉडकास्टमध्ये हजर राहिली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलसे केले आहेत. यामध्ये लहानपणी आलेल्या भयंकर प्रसंगाबद्दलही सांगितले आहे. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. (anita hanssnadani on hottifying incidence)
अनीताने नुकतीच ‘हउटरफ्लाई’ला मुलाखत दिली. तिने यामध्ये सांगितले की, “जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आई आम्हाला रिक्षाने जाण्यासाठी १० रुपये द्यायची. पण ते पैसे आम्ही वाचवायचो आणि येताना चालत यायचो. वाचलेले पैसे आम्ही कँटिनमध्ये खाऊ खाण्यासाठी वापरायचो. पण जेव्हा आम्ही चालत यायचो तेव्हा एक रिक्षावाला असायचा. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जायचो तेव्हा तो पॅंट काढून उभा राहायचा व स्वतःला वेगळ्या पद्धतीने स्पर्श करायचा व खूप घाणेरड्या नजरेने बघायचा”.
पुढे ती म्हणाली की, “त्याच्या भीतीमुळे आम्ही आमचा रस्तादेखील बदलला. पण तो आमचा पाठलाग करेल अशी भीती वाटायची. मी मुलींच्या शाळेत शिकायचे आणि त्या रिक्षावाल्याला आमचा रस्ता माहीत होता. त्यामुळे कोणतीही रिक्षा आली की आम्ही खूप घाबरायचो”.
दरम्यान अनीताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती दिव्यांका त्रिपाठी व करण पटेल यांच्याबरोबर ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमध्ये दिसून आली होती. तसेच सध्या ती ‘सुमन इंदौरी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. यामध्ये तिच्याबरोबर श्वेता गौतम, जैन इमाम व अशनूर कौरदेखील दिसून येत आहेत.दरम्यान या पॉडकास्टमध्ये तिने तिच्या एजाज खान बरोबर असलेल्या नात्याबद्दलदेखील भाष्य केले होते. अनिताच्या आईचा या नात्याला पाठिंबा नसल्याचेदेखील तिने सांगितले होते. तसेच हिंदू-मुसलमान असा फरक असल्यानेही तिने एजाजबरोबरचे नातं संपवल होतं.