Divyanka Tripathi Shared Goodnews : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडपे आहे. दिव्यांका व विवेक यांनी ८ जुलै २०१६ रोजी लग्न केले. तेव्हापासून, ही जोडी नेहमीच चर्चेत राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. लग्नाच्या अनेक वर्षानंतर आता हे जोडपे गुड न्यूज कधी देणार याचे चाहते वाट पाहत आहेत. सध्या अभिनेत्रीच्या ताज्या फोटोंनंतर चाहत्यांची प्रतीक्षा संपल्याचं दिसत आहे. दिव्यांका आणि तिचा पती विवेक यांनी नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीत सहभाग घेतला होता. यावेळी दिव्यांका व विवेक यांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला.
दिवाळी सेलिब्रेशनसाठी दिव्यांकाने गोल्डन डिटेलिंगसह बॉटल ग्रीन कलरचा मखमली कुर्ता परिधान केला होता. यावेळी तिने मोहरी रंगाचा पटियाला आणि दुपट्टा परिधान केला होता. दिव्यांकाने तिच्या लूकला गोल्डन हील्सही घातले होते. तिने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला आणि केस मोकळे सोडले होते, या लूकमध्ये अभिनेत्री खूप खास दिसत होती. तर विवेक दहिया मरुन रंगाच्या कुर्ता पायजमा सेटमध्ये डॅशिंग दिसत होता. यावेळी दिव्यांकाने तिचे पोट दुपट्ट्याने लपवले होते आणि तिचा बेबी बंपही दिसत होता. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना जोर आला.
दिव्यांकाच्या दिवाळी पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला आहे. हे फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, “ती प्रेग्नंट आहे का?”. तर इतरांनी देखील असेच लिहिले आहे की, “ती गर्भवती आहे का?”. तर दुसऱ्याने विचारले, “मॅम, तुम्ही गरोदर आहात का?”. दिव्यांकाने नेटकऱ्यांनी दिलेल्या या गरोदरपणाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही.
आणखी वाचा – आयोध्येतील माकडांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हात, आई-वडील व सासऱ्यांच्या नावाने दान केले कोटी रुपये कारण…
दिव्यांकाच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच तिचे वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेले आहे. २००६ मध्ये, ती ‘बनू मैं तेरी दुल्हन’ सह-अभिनेता शरद मल्होत्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्यांची प्रेमकहाणी काही दिवसांतच संपुष्टात आली. काही वर्षांनंतर, १६ जानेवारी २०१६ रोजी, दिव्यांकाने ‘ये है मोहब्बतें’ सह-अभिनेता विवेक दहियाबरोबर प्रेमाची कबुली दिली. सेटवर सुरु झालेली त्यांची प्रेमकहाणी लग्नाच्या मुक्कामापर्यंत पोहोचली आणि त्यांनी ८ जुलै २०१६ रोजी लग्नगाठ बांधली.