छोट्या पडद्यावरील एक बहुचर्चित जोडी म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश.हे दोघे बिग बॉस 15 मध्ये सहभागी झाले होते, बिग बॉसच्या घरातच दोघांची मैत्री झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातच दोघांनी एकमेकांचं रिलेशनशिप कबुल केलं.पण आता या दोघांच्या नात्यात काही तरी बिनसलं असं बोललं जातंय.(Karan Kundra & Tejasswi Prakash)
करण आणि तेजस्वी हे दोघेही सोशल मीडिययावर नेहमी एकमेकांसोबतचे फोटो,व्हिडीओ शेअर करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात.पण सध्या त्यांच्या नात्यात काही तरी बिनसलं असं म्हटलं जात,. याचं कारण म्हणजे करणने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. ना तेरी शान कम होती, ना रुबता कम होता, जो घमंड मैं कहा वही हस के कहा होता..अशा पद्धतीचं ट्विट करणने केल्याने त्याच्या आणि तेजस्वीचं ब्रेकअप झालं अशी चर्चा रंगली.अनेकांनी ब्रेकअप झालं का? असं देखील कॉमेंट मधून विचारलं आहे.

=====
हे देखील नक्की वाचा-आईच्या पाठवणी वेळी मुलं झाली भावुक
=====
तर करणने तुटी-ए-बाद-ए-मुख़ालिफ़ से न घबरा ऐ उक़ाब,ये तो चलती है तुझे ऊँचा उड़ाने के लिए अशी देखील शायरी शेअर केली आहे. तर त्यांच्यात नेमकं काय झालं हे अद्यापही स्पष्ट झालं नाही.
गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. करणने एका मुलाखतीत देखील मी तिच्याशी लग्न करायला कधीही तयार आहे असं म्हटलं होत.तर आता त्यांच्यात नेमकं काय झालं?, भांडण झालं का?,असे अनेक प्रश आता चाहत्यांना पडले आहेत.(Karan Kundra & Tejasswi Prakash)

तेजस्वी काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मन कस्तुरी रे सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती. या वेळी तिने अभिनेता अभिनय बेर्डेसोबत स्क्रीन शेअर केली.याशिवाय तेजस्वी ‘नागिन 6’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून दोघांचं लग्न कधी होणार याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तेजस्वीने बिग बॉस १५चं विजेतेपद पटकावलं होतं.