सुबोध भावेने प्रथम दिग्दर्शन केलेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या चित्रपटातील गाणी तितक्यात आवडीने ऐकली जातात. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला २०२२ला सात वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य साधून सुबोध भावेने पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. हाअ चित्रपट म्हणजे ‘संगीत मानापमान’. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय नजराणा ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून यात चित्रपटातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.
“स्वर, सौंदर्य आणि शौर्याचा अद्भुत मिलाफ! सादर आहे कै.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवरून प्रेरीत ‘संगीत मानापमान’ या संगीतमय चित्रपटाची झलक.. येत्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर अनुभवूया मराठी परंपरेचा साज आणि सुरेल गीतांचा आवाज” असं म्हणत हा खास टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे धैर्यधरची भूमिका साकरणार आहे. धैर्यधरला सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे. पण त्याची आई त्याचया इच्छेच्या विरोधात असून त्याला लग्नबंधनात अडकण्याच्या घाईत आहे. त्यामुळे हा धैर्यधर नक्की कोण आहे? धैर्यधर हा राजा नाही ना? किंवा त्याचा पुर्जजन्म झाला नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात गुपित ठेवण्यात आली आहेत.
आणखी वाचा – “दोन कानाखाली मारायलाही मी…”, अश्विनी भावेंनाही इंडस्ट्रीमध्ये वाईट अनुभव, म्हणाल्या, “लोक मला घाबरतात आणि…”
सुबोधने आजवर अनेक मालिका, चित्रपट व मालिकांमधू आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांच्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांमध्ये सुबोधनं काम केलं आहे. तसेच ‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. अशातच आता सुबोधच्या ‘संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सुबोधबरोबरच आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? याकडे आता आनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोधने केलं असून या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत लाभले आहे. जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीला प्रेरित संगीतमय हा चित्रपट येत्या १ नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे.