मानवी जीवनात सध्या पैसा हा एक अविभाज्य घटक बनला आहे.अधिका अधिक पैसा कमविण्यासाठी माणूस नेहमी धडपड करत असतो.तर हाच पैसा काहींना मिळाल्यावर अनेक जण आनंदी होतात तर काही जणांकडे बक्कळ पैसा असुंनही नैराश असतात. तर असाच एक प्रसंग मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घडला आहे.(ashok saraf struggle story)
मराठी सिनेसृष्टीतील अशोक आणि निवेदिता सराफ ही सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक आहे. या जोडीला कोणत्याही प्रस्तावनेची गरज भासत नाही.आपल्या कामातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिनही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. या दोघांची प्रेमकहाणी त्या काळात खूपच गाजली होती आणि या प्रेमकहाणीची आजही चर्चा रंगते. अशोक आणि निवेदिता यांच्या वयामध्ये १८ वर्षांचे अंतर आहे. प्रेमाला कसलेही बंधन नसते ही गोष्ट अशोक आणि निवेदिता यांच्याबाबतीत दिसून येते. त्यांच्या लग्नाला एकूण ३३ वर्ष पूर्ण झाली आहे.त्यांचं कुटुंब नेहमी एकनिष्ठ दिसून येते त्यांचा मुलगा अनिकेत हा परदेशात शेफ आहे.(Ashok Saraf)

खरतर अनिकेत मोठा होईपर्यंत निवेदिता सिनेसृष्टीपासून दूर होत्या. त्याच काळात अशोक हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. आपल्या या यशामध्ये पत्नी निवेदिताचा वाटा महत्त्वाचा आहे, असे अशोक सराफ नेहमी आवर्जून सांगतात. तर असाच एक अशोक सराफ यांनी त्याच्या मुलाचा अनिकेत संबंधीचा एक किस्सा सांगितला,ज्यामुळे त्यांचा पैश्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आयुष्यात त्यांना एक मोठी शिकवण मिळाली,अशोक सराफ हे कुटुंबासोबत गोव्यात देवदर्शनाला गेले होते तिथूनच ते कोल्हापुरातील शूटिंग आटपून परत मुंबईला परतताना ट्रेनमध्ये हा प्रसंग घडला. त्यावेळी अनिकेत १ वर्षाचाही नव्हता.
या प्रसंगाने अशोक सराफ यांना शिकवला मोठा धडा(ashok saraf struggle story)
“कोल्हापुरातून मुबंईत परतताना गाडी सकाळी अंबरनाथला खूप वेळ थांबली,अनिकेत खूप रडत होता. त्याला भूक लागली होती.पण तेव्हा आमच्या जवळ असलेलं दूध नासलं होत. तेव्हा मी त्याची बाटली घेतली आणि ट्रेनमधून खाली उतरलो. मध्येच ट्रेन सुटेल याची भीती होती पण तरीही लेकासाठी मी पाच ट्रॅक पार करून रस्त्यावर गेलो.पण तिथे आजूबाजूला दुकान नव्हती. त्यावेळी खरं तर माझ्या खिशात चाळीस हजार रुपये होते, मात्र त्याचा काहीच उपयोग नव्हता.

त्यावेळी मी माझ्या मुलाला दूध मिळवून देऊ शकत नव्हतो,म्हणून मला रडायला यायला लागलं, शेतवती मी पुन्हा येऊन मुलाला ग्लुकोजच्या पाण्यातील बिस्किटाचा तुकडा खाऊ घातला. तेव्हा मला मोठा धडा मिळाला की, पैसा नेहमीच उपयोगी नाही” असायचं अनुभवातून अशोक मामा घडलेत,ते त्यांचे अनेक अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत त्याना सल्ला देत असतात.तर हा किस्सा अशोक सराफ यांच्या मी बहुरूपी पुस्तकातील असून या पुस्तकांचे शब्दांकन मीना कर्णिक यांनी केले आहे.(ashok saraf struggle story)
अनिकेत हा सिनेसृष्टीपासून दूर असून तो शेफ आहे आणि हा निर्णय त्याने स्वतः घेतला, पण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी त्याला कधीच विरोध केला नाही. तर अशोक सराफ यांनी अशी ही बनवाबनवी,अफलातून अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केलं,नुकतंच मामांनी सध्या बहुचर्चित ‘वेड’ या चित्रपटात काम केलं आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाला यशस्वी बनविण्यात मोठा वाटा उचलला आहे.
आजही त्यांचा सहजसुंदर अभिनय आणि कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या वेड हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.तर सध्या निवेदिता सराफ या कलर्स मराठीवर भाग्य दिले तू मला या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. याशिवाय त्यांचं स्वतःचं ‘निवेदिता सराफ रेसिपी’ नावाचं यूट्यूब चॅनलही आहे.
====
हे देखील वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये श्रेया बुगडेने घेतली सागर कारंडेची जागा
====