‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. या सीरिजने अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. ‘आठवी-अ’च्या भरोघोस यशानंतर नुकतीच ‘दहावी-अ’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस अली आहे. या सीरिजच्या अफाट लोकप्रियतेमुळे सीरिजमधील बालकलाकारांना एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. हे छोटे कलाकार आता मोठे सेलिब्रिटी झाले आहेत आणि त्यांना गावागावातून वेगळी ओळख मिळत आहे. (street children meeting dahavi-a artist)
‘आठवी-अ’ या सीरिजमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आजही धुमाकूळ घालताना दिसत आहे. अशातच ‘आठवी-अ’च्या लहान मुलांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘आठवी-अ’चे काही कलाकार शॉपमध्ये असताना त्यांच्याभोवती रस्त्यावरील लहान मुलांनी गराडा घातला. त्या मुलांनी ‘दहावी-अ’च्या रेश्मा, केवडा, मध्या व आभ्या यांना ओळखलं. यावेळी केवडा, मध्या, आभ्या आणि रेश्मा म्हणजेच सृष्टी दणाणे, ओम पानस्कर, अर्थव अधाटे व संयोगीता चौधरी यांनीही त्या मुलांची भेट घेतली.
आणखी वाचा – “बॉलिवूडने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं”, स्वरा भास्करचा मोठा दावा, आरोप करत म्हणाली, “खूप दुःख वाटलं कारण…”
‘दहावी-अ’च्या क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे यांनी हा आपल्या सोहल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “आम्ही ‘दहावी-अ’ बघतो” असं कानावर आलं आणि सगळा थकवा दूर झाला…याचसाठी केला होता अट्टाहास…तू केवडा ना? तू आभ्या ना? काय कमावलं या सीरिजने तर हेच… आज खऱ्या अर्थाने सिरिज घराघरात पोहोचली”. दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
“तुम्ही मोठेपणा न करता त्या लहान मुलांना जवळ घेतलं. त्यातच तुम्ही सगळ्यांची मन जिंकली”, “काय भावना येत असेल राव खतरनाक”, “पूर्ण टीमला शुभेच्छा”, “दहावी अ खूप छान मस्त”, अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसंच यानिमिताने नेटकऱ्यांनी ‘दहावी-अ’च्या कलाकारांचच्या या कृतीचेही कौतुक केलं आहे.