बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे आणि अखेर अभिनेत्री झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.
सोनाक्षीच्या लग्नाममुळे तिचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे नाराज असल्याच्या अनेक चर्चा सुरु होत्या. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला जाणार नसल्याबद्दलही बोलले जात होते. मात्र तसे काही नसून शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला हजर होते. तसेच त्यांनी आपल्या लेकीला व जवायला आशीर्वादही दिले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा – सोमवारी मिथुन राशीसह ‘या’ राशीच्या लोकांची होईल इच्छित प्रगती, आर्थिक फायदाही होणार, जाणून घ्या…
यावेळी शत्रुघ्न सिन्हा असं म्हणाले की, “प्रत्येक वडील या क्षणाची वाट पाहत असतात, जेव्हा त्याची मुलगी तिच्या आवडीच्या व्यक्तीकडे सोपवली जाते. माझी मुलगी झहीरबरोबर खूप आनंदी आहे. ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि देव या जोडप्याला कायम आनंदी व सुखी ठेवो”. अगदी साधेपणाने सोनाली व झहीरने हे लग्न केलं आहे. सोनालीने लग्नात पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती, तर झहीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नावेळी सोनालीचे वडील शत्रुघ्न सिन्हाही खूप आनंदी असल्याचे दिसले.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून रविवार रोजी संध्याकाळी नोंदणी पद्धतीने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. सोनाक्षी-झहीरने सिव्हिल मॅरेज म्हणजेच १९५४ च्या स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत, मुंबईतील वांद्रे येथे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्नाची नोंदणी केली आहे. त्यांच्या या लग्नानंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.