shardiya navratri 2025 : अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रला शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते. यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु होईल आणि १ ऑक्टोबर रोजी संपेल. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी (विजयदशामी 2025) माता दुर्गाचे विसर्जन केले जाईल. नवरात्र सुरु होताच अनेक भक्त याची तयारी करण्यास सुरुवात करतात. नवरात्रीतील नऊ दिवसांत माता दुर्गेच्या वेगवेगळ्या स्वरुपांची पूजा केली जाते. पण पहिला दिवस हा महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घट स्थापना किंवा कलश स्थापित केला जातो. कलश स्थापित केल्यावरच उपासना सुरु होते. म्हणून, ही पद्धत महत्त्वपूर्ण मानली जाते.
घट स्थापनेच्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. हा कलश नऊ दिवस देवी दुर्गेच्या मूर्तीसमोर राहील. अनेक ज्योतिषांच्या मते नवरात्रात घट बसवण्यासाठी फक्त मातीचा कलश वापरला जावा. स्थापनेत मातीच्या कलशाचे महत्त्व काय आहे त्याबाबत यंदाची नवरात्र सूर होण्यापूर्वी सविस्तर जाणून घेऊयात…
आणखी वाचा – काविळने घेरलं, सेटवर बेशुद्ध पडला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन, कलाकार हळहळले
घट स्थापनेसाठी मातीचा कलश का वापरावा?
हा कलश प्राचीन काळापासून पूजेमध्ये स्थापित केला जातो, ज्यासाठी फक्त मातीचा कलश वापरला गेला आहे. तथापि, या व्यतिरिक्त, पितळ, स्टील, तांबे सारख्या अनेक धातूंचे कलश वापरले जातात.
परंतु मातीचा कलश ही उपासना किंवा धार्मिक विधीसाठी शुद्ध मानली जाते. म्हणून, नवरात्राच्या दिवशी, शुभ वेळेत, मातीच्या कलशाने ते स्थापित केले जाते. यामुळे आई दुर्गा आनंदी होईल आणि उपासनेचे फळ मिळेल.
आणखी वाचा – लग्नाआधीच गुडन्यूज?, भूषण प्रधान आणि केतकी नारायणच्या ‘त्या’ फोटोंची चर्चा, नेमकं प्रकरण काय?
घट स्थापना २०२५ मुहूर्त (नवरात्रीतील घटस्थापनेचा मुहूर्त २०२५)
शुभ वेळ – सकाळी ०६ वाजून ०९ मिनिट ते ०८ वाजून ०६ मिनिटपर्यंत
अभिजीत मुहूर्त – सकाळी ११.४९ ते १२.३८ पर्यंत असेल.





