रोमान्स किंग हे बिरुद मिरवणारा शाहरुख खानचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. रील लाईफ प्रमाणे तो रिअल लाईफ मध्येही तितकाच रोमॅंटिक आहे. शाहरुख आणि गौरीच्या नात्याकडे पाहून याची प्रचिती येतेच. बी टाऊनमध्ये शाहरुख आणि गौरी या जोडीकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. शाहरुखकडे फेम, ग्लॅमर काही नसताना गौरीने त्याची तेव्हापासून तब्बल आजवर ३० वर्ष साथ दिली. (shahrukh khan changed his name)
दरम्यान शाहरुखनेही गौरीचा योग्य तो परी सांभाळ केला. नुकताच शाहरुख आणि गौरीच्या नात्यातील एक किस्सा समोर आला आहे, यांत गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने स्वतःच नाव बदललं होत. लेखक, अभिनेता आणि शाहरुखचा जवळचा मित्र मुस्ताक शेख याने त्याच्या एका पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
पाहा गौरीसोबत लग्न करायला शाहरुखने कोणतं नावं ठेवलं (shahrukh khan changed his name)
सुरुवातीला शाहरुख सोबत लग्न होणार म्हणून गौरीचे आई वडील कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. मात्र कालांतराने त्यांनी या लग्नाला होकार दिला, त्यांच्या या लग्नासाठी शाहरुख खानने चक्क स्वतःचं नावदेखील बदललं होतं.
गौरीबरोबर आर्य समाजाच्या पद्धतीने लग्नगाठ बांधण्यासाठी शाहरुखने त्याचं नाव ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ असं ठेवलं होतं. शाहरुखने हेच नाव का निवडलं या बाबतचा खुलासा या पुस्तकात नमूद करण्यात आला आहे. या नावाच्या माध्यमातून शाहरुखने दोन जुन्या सुपरस्टार्सना मानवंदना दिली आहे. शाहरुखच्या आजीला तो जितेंद्रसारखा वाटत असल्याने त्याने पहिले हे नाव निवडले, आणि टुल्ली हे अभिनेते राजेंद्र कुमार यांचे खरे आडनाव होते. यामुळेच त्याने ही दोन नावं जोडून लग्नासाठी ‘जितेंद्र कुमार टुल्ली’ हे नाव लावायचं ठरलं.
शाहरुख आणि गौरीने आधी हिंदू रितीरिवाजानुसार आणि मग मुस्लिम परंपरेनुसार लग्न केलं, इतकंच नव्हे तर त्यांनी कोर्टात जाऊनही लग्न केलं. शाहरुखने लग्नासाठी नाव बदलल्याचं पाहून मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न करताना गौरीनेही ‘आयेशा’ हे नाव लावलं होतं.
