झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत आता रुपालीला विरोचकाकडून प्रतिबिंब शक्ती प्राप्त झाली आहे. तसेच रुपालीला नेत्रा आता गरोदर असल्याचीही शंका आली आहे. रुपाली राजाध्यक्षांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यासाठी घरातील सर्वांसाठी भेटवस्तूही घेऊन येत असल्याचे कालच्या भागात पाहायला मिळाले. या सगळ्या भेटवस्तू ती घरातल्यांना देते.
आजच्या भागांत रुपाली केतकी काकू फाल्गुनी व तन्मय छोट्या बाळाचे कपडे का बघत होते असा विचार करत असते आणि ती नेत्राच्या गरोदरपणाविषयी माहिती करून घ्यायला पाहिजे असं ठरवते. त्यांतरे नेत्रा अद्वैतला विरोचकाकडे कोणती तरी शक्ती आली अस्लयचे सांगते. तेव्हा अद्वैत दिला केतकी काकू आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे वागत असल्याचे तिला सांगतो. त्यानंतर नेत्रा घरातील व्यक्तींविषयी काळजी करते. तसंच आपण किती वेळ विरोचकापासून मी गरोदर असल्याचे किती वेळ लपवून ठेवणार असंही म्हणते.
पुढे अद्वैत आपल्या बाळाला काही होता कामा नये असं म्हणतो. त्यानंतर रुपाली त्यांच्या खोलीत येते व नेत्राविषयी बोलायचे असल्याचे सांगते आणि तिच्या तब्येतीविषयी विचारपूसही करते, तसेच ती नेत्राच्या चेहऱ्यावर ग्लो आल्याचेही नेत्रालं सांगते, मात्र अद्वैत तिला खोलीतून बाहेर काढतो. यामुळे रुपालीला काहीतरी गडबड असल्याचे कळते, त्यामुळे ती तिच्या प्रतिबिंब शक्तीचा अद्वैतविरोधात वापर करण्याचा विचार करते.
आणखी वाचा – मेष, वृषभ व सिंह राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस धनलाभाचा, व्यवसाय व नोकरीत होणार बरकत, जाणून घ्या…
यानंतर रुपाली तिच्या खोलीत येऊन त्या प्रतिबिंब शक्तीचा अद्वैतविरोधात वापर करते. ती श्लोकाचे वाचन करताच अद्वैत तिच्यासमोर उभा राहतो आणि यानंतर ती अद्वैतच्याअ प्रतिबिंबाकडे बघून नेत्रा व इंद्राणीला मारण्याविषयी सांगते, मात्र अद्वैत तसे काहीही करत नसल्याचे तिला कळते. यानंतर ती अद्वैतला नेत्राच्या गरोदरपणाविषयी माहिती काढून आणण्याविषयी सांगते. त्यानंतर अद्वैतचे प्रतिबिंब असलेला अद्वैत नेत्राच्या खोलीत जातो. मात्र नेत्राला तो खरा अद्वैत असल्याचे कळतच नाही.
आणखी वाचा – ‘सैराट’मधील लंगड्या अजूनही करतो शेती, गावाकडे गुरांना चरायलाही घेऊन जातो अन्…; पाहा फोटो
यादरम्यान, खरा अद्वैत खोलीत जाऊ नये म्हणून रुपाली स्वयंपाक घराच्या इथे खऱ्या अद्वैतपाशी थांबते. तो खोलीत जाऊ नये म्हणून प्रयत्न करत असते आणि तो खोलीत जाऊ नये म्हणून प्रयत्न करते. इतक्यात इकडे प्रतिबिंब वाला अद्वैत नेत्राचे सगळे रिपोर्टस् बघतो. त्यामुळे आता रुपाली पर्यंत नेत्रा गरोदर असल्याची माहिती पोहोचणार का? यामुळे ती नेत्रा किंवा तिच्या बाळाला काही इजा करणार की नाही? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.