सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पळून जाऊन लग्न, बायकोचं सहा महिन्यांतच निधन अन्…; संदीप खरेंनी सांगितला चाहत्याचा ‘तो’ भयावह प्रसंग, म्हणाले, “ती कॅन्सरमुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 21, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sandeep Khare narrated a shocking incident of his fan see the details

पळून जाऊन लग्न, बायकोचं सहा महिन्यांतच निधन अन्...; संदीप खरेंनी सांगितला चाहत्याचा 'तो' भयावह प्रसंग, म्हणाले, "ती कॅन्सरमुळे..."

प्रत्येक कलाकाराचे चाहते हे असतातच आणि या चाहत्यांचे आवडत्या कलाकाराविषयीचे काहीना काही किस्सेदेखील असतात. हे किस्से कधी गंमतीशीर असतात, मात्र कधी मन सुन्न करणारे असतात. त्यातही कवी, गीतकार यांच्या वाटेला त्यांच्या चाहत्यांच्या अशा किस्स्यांची रास ही अधिकच असते. असाच एक मन सुन्न करणारा प्रसंग सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्याबद्दलचा आहे.

“आयुष्यावर बोलू काही…” या काव्य-सुरांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सलील-संदीप हे अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. या प्रवासात त्यांना त्यांच्या कवितांचे किस्से सांगणारे अनेकजण भेटत असतात. असंच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीप यांना त्यांच्या एका चाहत्याने त्यांच्या ‘नसतेस घरी तू जेव्हा’ या गाण्याविषयीच्या आठवणीचा प्रसंग सांगितला आणि हा प्रसंग ऐकून तेदेखील सुन्न झाले. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप यांनी हा प्रसंग सांगितला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Khare (@sandeepkhareofficial)

यावेळी ते असं म्हणाले की, “कधी कधी सुन्न करणारा प्रसंगही येतो. एकदा एका कार्यक्रमाचे आयोजक आम्हाला न्यायला आले होते. तेव्हा त्यांनी गाडीत ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं लावलं. तर आता आम्हाला याची सवय झाली आहे की, म्हणजे आम्ही असे कार्यक्रमाला वगैरे जात असताना ते ज्या कलाकाराचा कार्यक्रम असेल त्याचीच कॅसेट किंवा गाणी लावतात आणि आमच्या कारमध्ये कायम हेच वाजतं वगैरे बोलतात. काही अपवाद सोडले तर बऱ्यापैकी सगळेचजण अनेकदा मुद्दाम वागतात. तर आम्हालाही हे मुद्दाम करणाऱ्यांसारखे वाटले. तर आम्ही त्यांना म्हटलं की अहो हे गाणं बंद करा. कारण आता जाऊन हेच गायचं आहे.”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, अमाही त्याला गाणं बंद करायला सांगताच तो “नाही राहुदेत ना. मला हे एक गाणं तुमच्याबरोबर ऐकायचं आहे” असं म्हणाला आणि मग हे त्याने सांगितलं की, “हे गाणं मला अशासाठी ऐकायचं आहे की, गेल्या वर्षी मी आणि माझ्या बायकोने पळून जाऊन लग्न केलं. दोघांच्याही घरातून विरोध होता. त्यामुळे दोन्ही घराची दारं आमच्यासाठी बंद झाली आणि लग्न झाल्यानंतर ६ महिन्यांनी ती कॅन्सरमुळे गेली.” आणि त्याचं हे ऐकून ते गाणं माझ्याचं अंगावर आलं की त्याला या परिस्थितीत हे गाणं ऐकून काय वाटत असेल.”

Tags: marathi entertainment newsMarathi newsSandeep Khare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
shaktimaan star cast

'शक्तिमान'मधील मुकेश खन्ना सतत चर्चेत, पण या मालिकेतील इतर कलाकार आता कोणत्या परिस्थितीत?, जगत आहेत असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.