बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कुटुंबाला भेटायला गेली रिंकू राजगुरु, फोटोही केला शेअर, म्हणाली, “खूप दिवसांनी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 12, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rinku Rajguru With Govinda Family

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कुटुंबाला भेटायला गेली रिंकू राजगुरु, फोटोही केला शेअर, म्हणाली, "खूप दिवसांनी..."

‘सैराट’ या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रिंकूने आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली. ‘सैराट’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर या अभिनेत्रींकडे अनेक चित्रपटाची ऑफर चालून आली. एकामागोमाग एक रिंकू चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, मराठी सिनेसुष्टीसह अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही भरभरुन कौतुक करण्यात आलं. (Rinku Rajguru With Govinda Family)

सोशल मीडियावरही रिंकू बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. रिंकूचे फोटोशूटही तिच्या चाहत्यांना विशेष भावतात. याशिवाय रिंकू बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. काही दिवसांपूर्वीच रिंकूने सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसरसह आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती. आयरा खानच्या रिसेप्शन सोहळ्यातील रिंकूचा मराठमोळा लूक चाहत्यांना विशेष आवडला.

आणखी वाचा – ऋषी कपूर यांच्या कुशीमध्ये दिसली रणबीर कपूर-आलिया भट्टची लेक, नीतू कपूर यांना भावना अनावर

यानंतर आता रिंकूने नागभीड येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी जमलेली पाहायला मिळाली. या कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदाच्या कुटुंबियांबरोबर ती पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – लग्नाची अजब गोष्ट! अर्शद वारसीने २५ वर्षांनंतर लग्न केलं रजिस्टर, बायकोला खास सरप्राइजही दिलं अन्…

रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा, मुलगा यशवर्धन, मुलगी टीना दिसत आहेत. गोविंदाच्या पत्नी यांनी रिंकूला घट्ट मिठी मारत हा फोटो काढलेला पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत रिंकूने, “बऱ्याच दिवसांनी भेटले” असं म्हटलं आहे. रिंकूचा गोविंदाच्या कुटुंबियांबरोबरचा हा फोटो सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. रिंकूसाठी ही गोविंदाच्या कुटुंबीयांबरोबरची भेट खास असल्याचं या फोटोवरुन कळत आहे.

Tags: entertainmentgovinda familymarathi actressmarathi movierinku rajgururinku rajguru instagram
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Kiran rao on aamir khan

आमिर खानची पत्नी म्हणून बोलणं किरण रावला पचेना, स्पष्टच बोलली, म्हणाली, “लोक त्याची बायको…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.