Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड स्टार सैफ अली खान उपचारानंतर आता त्याच्या घरी परतला आहे. २१ जानेवारीला अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्याच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे, दरम्यान त्याची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने खान कुटुंबातील सदस्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सैफच्या बहिणीने या व्यक्तीला हिरो म्हटले आहे. सबा अली खान भावावर हल्ला झाल्यापासून ती चाहत्यांसाठी अभिनेत्याशी संबंधित अपडेट्स सतत शेअर करत आहे.
अलीकडेच, तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सैफच्या धाकट्या मुलाची आया एलियामा फिलिप आणि घरातील एक महिला कर्मचारी सदस्याचा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “हिरो, ज्याने अत्यंत गरज असताना आपले काम जबाबदारीने केले. देव तुम्हा दोघांना आणि माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद देवो. तुम्ही लोक सर्वोत्तम आहात”. हल्लेखोर घरात घुसले तेव्हा दोघीही घरात उपस्थित होत्या आणि कुटुंबाचा बचाव करण्यात मदत केली असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा – ब्रेकअप झालंच नाही; बॉयफ्रेंडबरोबरच राहते हिना खान, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लग्न कर…”

सबा अली खानने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये तिने आपल्या भावाच्या तब्येतीबद्दल लोकांना अपडेट केले आहे आणि सांगितले आहे की, तिचा भाऊ आता ठीक आहे आणि आपल्या भावाबरोबर वेळ घालवून परत आल्यावर तिला खूप बरे वाटत आहे. तिने पुढे लिहिले की, “माझ्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे मला कळले नसले तरी मला आणि माझ्या भावाला अब्बाच्या क्रिकेट दुखापतीची आठवण झाली”. सध्या तीही बरी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर सैफ अली खानची सुरक्षा आणखी कडक करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. काल २१ जानेवारी रोजी संध्याकाळी बातमी आली की प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रोनित रॉयच्या सिक्युरिटी फर्मने त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. रोनित एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन एजन्सीचा मालक आहे. त्याने यापूर्वी मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे.