पाळीव प्राण्यांची अनेकांना बरीच ओढ असते. श्वानप्रेमी तर कुत्र्यांबाबत एखादा प्रसंग घडला की, लगेचच धावून येतात. मात्र अशा कित्येक घटना आहेत ज्यामुळे माणसांना दुखापत होते. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे दुखापत झालेल्या घटना अनेक आहेत. पण आता एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आता तर एका चार महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. अहमदाबादमधल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पाळीव कुत्र्याच्या मालकाचीच चूक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (Ahmedabad Rotweiller Attack Viral Video)
पाळीव कुत्र्याचा हल्ला
अहमदाबादमधील सोसायटीमधील थक्क करणारा प्रकार कॅमेऱ्यामध्ये उघड झाला आहे. पाळीव कुत्रा रॉटविलरला घेऊन मालक सोसायटीमध्ये फेऱ्या मारत होता. तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संध्याकाळी लहान मुलीला तिची १७ वर्षीय मावशी हिना सोसायटीच्या परिसरामध्ये फिरायला घेऊन आली होती. दरम्यान चिमुकली खेळत असताना हिना इतरांसह गप्पाही मारत होती. तिचं चिमुकलीकडे लक्षही होतं.
आणखी वाचा – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढली, नवा आजार आणखी धोकादायक, लक्षणं काय?
पाहा व्हिडीओ
Rotweiller Dog k!lled 4 month old baby girl in Ahmedabad💔
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 20, 2025
pic.twitter.com/mvnhpRRbwJ
चिमुकलीवर धावून गेला अन्…
हिना मुलीला घेऊन फेरफटका मारत असतानाच रॉटविलरला घेऊन मालकही आला. त्याच्या गळ्यात पट्टा बांधला होता. मालकाच्या हातात रॉटविलरचा पट्टा होता. दरम्यान त्याने अचानकच हिनाच्या अंगावर उडी मारली. हिना खाली पडली. त्यानंतर रॉटविलरने चार महिन्याच्या चिमुकलीवर हल्ला केला. त्यामुळे चिमुकलीच्या डोक्याला जखम झाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लगेचच मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं. तातडीने तिच्यावर उपचार करण्यात आले.
आणखी वाचा – लोक मारायला जमले, दारू प्यायला आहे ओरडले अन्…; अपघात प्रकरणात अडकलेला अभिजीत सावंत, पोलिस स्टेशनमध्ये बसून…
उपचार सुरु असतानाच मृत्यू
चिमुकली लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून डॉक्टरांनीही बरेच प्रयत्न केले. मात्र रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी रुग्णालयातच चिमुकलीने शेवटचा श्वास घेतला. तिला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान हिनावरही त्याने मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिलाही कंबर व पोटामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. मुलीच्या आजोबांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. कुत्र्याच्या ५० वर्षीय मालकाला (दिलीप पटेल) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चार वर्षांपूर्वीच रॉटविलर दोन महिन्यांचा असताना त्याला मालकाने घरी आणलं होतं. सोसायटीमधील इतर माणसांच्या मागे हा कुत्रा बऱ्याचदा लागला, मुलांना त्रास दिला असल्याच्या घटना समोर आल्या. मात्र निष्काळजीपणामुळे आता चिमुकलीला जीव गमवावा लागला.