मराठी आणि हिंदी सिनेविश्वात ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि बायोपिक यांची चलती पाहायला मिळते.अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्तींचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येतात.तर अश्या चांगल्या व्यक्तिरेखा आपल्या वाटेल येण्याची कलाकार देखील वाट पाहात असतात. कारण बायोपिकच्या माध्यमातून काही काळ हा होईना कलाकारांना ही व्यक्तिरेखा अनुभवता येते. तर अशीच एक बायोपिक करण्याची इच्छा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने व्यक्त केली.(Rinku Rajguru biopic)
रिंकूला itsmajjaच्या मुलाखतीत तुला कोणाच्या बायोपिक मध्ये काम करायचं आहे असा प्रश्न विचारला असता, तिने एका महान व्यक्तीचं नाव घेतलं,मला सावित्रीबाईंची भूमिका साकारायची असं तिने म्हटलं. रिंकूला भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा बायोपिक साकारायची इच्छा आहे. सावित्रीबाई फुलेंनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी मुलींसाठी खूप काही केलं आहे असं महान व्यक्तीमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारायची संधी मिळाल्यास ती नक्की मी स्वीकारेन असं रिंकू म्हणाली. तर रिकु खरंच सावित्री बाई यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार का हे पाहणं रंजक असेल.
हे देखील वाचा: अपूर्वाच्या भावाने घेतला जगाचा निरोप हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन
तर रिंकू सैराट या चित्रपटातून घराघरात पोहचली.त्यातील तिची आर्ची ही भूमिका प्रचंड गाजली.त्यांनतर तिने मेकअप,कागर अश्या अनेक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारून सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.तिची प्रत्येक भूमिका प्रचंड गाजलीय.तर अश्यातच रिंकू आता कोणती नवी भूमिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.(Rinku Rajguru)
तर या आधी देखील आनंद दिघे यांच्या बायोपिकमध्ये आंनद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली होती. तर सिंधुताई सकपाळ यांच्या व्यक्तिरेखेवर सिंधुताई सपकाळ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला.तर या चित्रपटात अभिनेत्री तेजसिनी पंडित हीने सिंधुताईंची भूमिका साकारली होती.तर आता लवकरच निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.(Rinku Rajguru biopic)
