शुक्रवार, एप्रिल 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात…”, राकेश बापटला पूर्वाश्रमीच्या पत्नीचा सपोर्ट, म्हणाली, “तो जसा आहे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2026 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ridhi Dogra reaction Raqesh Bapat Bigg Boss Marathi 6

"पुन्हा 'बिग बॉस'च्या घरात…", राकेश बापटला पूर्वाश्रमीच्या पत्नीचा सपोर्ट, म्हणाली, "तो जसा आहे…"

Ridhi Dogra reaction Raqesh Bapat Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ सध्या जोरदार गाजतंय. यंदाच्या पर्वातील सगळेच स्पर्धक एकमेकांना वरचढ ठरत आहेत. यंदाच्या पर्वात अभिनेता राकेश बापट देखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. यापूर्वी ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेतील भूमिकेमुळे राकेशला विशेष लोकप्रियता मिळाली. यानंतर आता राकेश ‘बिग बॉस’मराठीच्या घरात धुमाकूळ घालत आहे. त्याच्या खेळाचे चाहत्यांकडून भरभरुन कौतुक केलं जात आहे. अशातच आता राकेशला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडूनही पाठिंबा मिळत आहे. राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्राला नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

घटस्फोटानंतरही राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. याच मैत्रीखातर तिने राकेशला कायम पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. सध्या रिद्धीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. राकेशच्या समर्थनार्थ असं म्हटलं की, “मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय. आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा.. तू पुन्हा बिग बॉसच्या घरात जात आहेस. पण यावेळी तो खूप छान कामगिरी करतोय. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय”.

आणखी वाचा – लेकाला ट्युमर, मोठी शस्त्रक्रिया आणि…; जॉनी लिव्हरच्या लेकाची होती वाईट अवस्था, लेकीने केला खुलासा

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

पुढे तिने म्हटलं, “आम्हाला जो राकेश माहीत आहे, तोच तिथे दिसतोय. मला खूप आनंद आहे की तो स्वत:च्या नियमांनुसार खेळ खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहेतच, पण यावेळी त्याला अशा वेगळ्या पाठिंब्याची विशेष गरज वाटत नाही. तरीसुद्धा मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन,” अशा शब्दांत रिधी व्यक्त झाली.

आणखी वाचा – वयाच्या ५०व्या वर्षी बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, अभिनेत्याच्या वडिलांच्या वाढदिवशीच केलं लेकीचं स्वागत, फोटो समोर

राकेश आणि रिधी यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एका मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली होती आणि सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Tags: bigg boss marathiraqesh bapatRidhi Dogra
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Disha vakani father last rites
Entertainment

Video : वडिलांच्या अंत्यसंस्काराला ढसाढसा रडली दयाबेन, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

एप्रिल 10, 2026 | 4:07 pm
Divyanka Tripathi Vivek Dahiya IVF controversy
Entertainment

IVF च्या खोट्या बातम्यांवर भडकलं सुप्रसिद्ध जोडपं, लग्नाच्या १० वर्षांनी होणार आहेत पालक, म्हणाले, “आम्हाला विचारा…”

एप्रिल 10, 2026 | 1:30 pm
Anant Ambani Birthday
Entertainment

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

एप्रिल 10, 2026 | 12:30 pm
Sushma Shiromani on rekha
Entertainment

‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, ” पैशाची…”

एप्रिल 10, 2026 | 11:30 am
Next Post
Govinda Sunita Ahuja's divorce rumours

"गेली दोन वर्षे चांगली गेली नाहीत", गोविंदा-सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर लेकीनेच सोडलं मौन, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.