Rakhi Sawant On Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादिया ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. या शोमधील युट्युबरच्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली असून तो नेटकऱ्यांच्या चांगलाच तावडीत अडकला आहे. सोशल मीडियावर रणवीर टीकेचा धनी झाला असून साऱ्यांच्या नजरेस उतरत आहे. असं असलं तर रणवीरला एका लोकप्रिय अभिनेत्रीच समर्थन मिळालं असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत. राखीकडून रणवीरला समर्थन मिळत आहे. ‘बिअर बायसेप्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या प्रसिद्ध पॉडकास्टरने कामगिरीच्या वेळी स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारल्याबद्दल कठोर टीका केली आहे. सध्या तो भाग यूट्यूबमधून काढण्यात आला आहे.
यासह, रणवीरसह इतर न्यायाधीश यांच्याविरुद्ध एफआयआर देखील नोंदविला गेला आहे. या चुकीनंतर रणवीरनेही दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु तरीही तो टीकेचा धनी बनला आहे. राखी सावंत प्रथम रणवीर अलाहबादियाच्या शोमध्ये दिसली आहे. रणवीरच्या माफी मागण्याच्या पोस्टवरील कमेंट सेशनमध्ये तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राखीने रणवीरला क्षमा करण्याचे आवाहन केले आहे. राखी हिने कमेंट करत असं म्हटलं की, “त्या माणसाला क्षमा करा. जे झाले ते अर्थात चुकीचेच आहे. कधीकधी त्याला माफ करा. मला माहित आहे की त्याने चूक केली, परंतु त्याला माफ करा”, अशी विनंती नेटकऱ्यांना केली आहे.
आणखी वाचा – रिंकू राजगुरूचा भाजप खासदाराच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल, दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण
रणवीरने माफी मागत असं म्हटलं की, “मी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जे बोललो ते मी बोलायला नको होतं. मला माफ करा. माझी टिप्पणी फक्त चुकीचीच नव्हती, तर मजेदारही नक्कीच नव्हती. कॉमेडी मला जमत नाही, मी इथे फक्त सॉरी म्हणायला आलो आहे. जे काही घडलं त्यामागील कोणताही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. माझ्याकडून चूक झाली. मी ते बोलायला नको होतं. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मला जबाबदारीचं भान नसलेली व्यक्ती व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मी कधीही अनादर करेन. मला या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे, हेच मी माझ्या अनुभवांमधून शिकलोय. मी निर्मात्यांना व्हिडीओतील असंवेदनशील विधानं हटवण्यास सांगितलं आहे. पुन्हा एकदा मी माफी मागतो, तुम्ही सगळे मला माफ कराल, अशी आशा आहे”.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात तक्रार दाखल, पालकांबद्दल अश्लील गोष्टी बोलणं पडलं महागात
गेल्या वर्षी दिल्लीतील ‘इंडिया गॉट लॅटंट’ या शोच्या पॅनेलमध्ये राखी होते. या भागाने नंतर अनेक कन्टेन्ट बनवला. रणवीर अलाहबादिया हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत असते. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.