मनोरंजन क्षेत्रात वावरणारे कलाकार फक्त अभिनयासाठीच नाहीत तर आपल्या खाजगी आयुष्यातील घटनांसाठी जास्त चर्चेत असतात. सध्याच्या घडीला अशीच एक अभिनेत्री खाजगी आयुष्यासाठी चांगलीच चर्चेत आहे. त्या अभिनेत्रीच नाव आहे राखी सावंत. राखी नेहमीची तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच नवरा आदिल सोबत केलेल्या लग्नापासून ते घटस्फोटापर्येंत राखी ट्रेंडिंग मध्ये दिसत आहे.
नुकताच राखीचा आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.(Rakhi sawant)
राखीने एका व्हिडिओ मध्ये आदिल ने मला मी हिंदू असल्यामुळे मला नाकारले आहे. तर त्याने मला घरात नमाज वाचायला सांगितलं. त्यामुळे मला त्याने नाकारलं आहे असं सांगितलं. आता तो माझे फोन ही उचलत नाही आणि मला घटस्फोटासाठी टॉर्चर करत आहे असं देखील राखीने सांगितलं आहे.

राखीचे असे अनेक विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहेत. ज्यात कधी ती आदिल सोबत आनंदात नांदतातने दिसते तर कधी भांडताना. काही दिवसांपूर्वीच राखीने आदिल सोबत पुन्हा लग्न केल्याचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता तर त्या क्षणानंतर काही दिवसांमध्ये लगेच राखीने आदिल मला घटस्फोटासाठी जबरदस्ती करत आहे असं मीडियाला सांगितलं होत.
नक्की काय आहे प्रकरण(Rakhi sawant)
राखीच्या लग्नाची गोष्ट जगासमोर आल्यापासून हा वाद वाढत चालला आहे. आदिलशी आपले आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते मात्र ते जगासमोर न आणण्यासाठी आदिल दबाव आणत असल्याचा खुलासा राखीने केला होता. राखीने आदिलवर मारहाण केल्याचा आणि दगा दिल्याचा आरोप केला होता. शिवाय त्याचे एका तनू नावाच्या मुलीशी अफेअर असल्याचेही तिने सांगितले होते. या दरम्यान राखीने गर्भपाताचाही खुलासा केला होता.
काहीदिवसांपूर्वीच राखीला मातृशोक झाला. गंभीर आजाराने राखीच्या आईने जगाचा निरोप घेतला. बिग बॉस मराठी आणि बॉग बॉस हिंदी मध्ये राखीची जरा जास्तच चर्चा रंगते. प्रत्येक गंगामाता राखीला बिग बॉस मध्ये बोलवले जाते. प्रेक्षकांना तिची मनोरंजन करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड आवड्ताना दिसते.(Rakhi sawant)