Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता वेग मिळाला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र सासरे राजेंद्र व दीर सुशील काही दिवसांपासून फरार होते. आता आज पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. शिवाय पोलिस हगवणे कुटुंबियांची कसून चौकशी करत आहेत. त्याचबरोबरीने या घटनेतील सकारात्मक बाब म्हणजे वैष्णवीच्या मुलाला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. वैष्णवीला योग्य तो न्याय मिळावा आणि तिच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कस्पटे कुटुंबिय झटत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबातील एक व्यक्ती सातत्याने चर्चेत राहिली आणि व्हिलन ठरली. ती व्यक्ती म्हणजे वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे. (who is karishma hagawane)
शिवीगाळ, घाणेरडा संशय अन्…
वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे संपूर्ण प्रकरणात मुख्य दोषी असल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे. वैष्णवीनेही मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीशी संवाद साधला होता. या संवादामध्येही तिने तिच्या नणंदेबाबत भाष्य केलं होतं. नणंदेने शिवीगाळ केली, घाणेरडा संशय घेतला असं वैष्णवीने मैत्रिणीशी बोलताना सांगितलं होतं. इतकंच काय तर वैष्णवीच्या आई-वडिलांनीही करिश्माबाबत खुलासे केले. करिश्मा वैष्णवीच्या तोंडावर थुकली, तिला मारहाण करायची असे थेट आरोप कस्पटे कुटुंबियांनी केले. हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगतापनेही नणंदेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले.
आणखी वाचा – आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…
हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन
हगवणे कुटुंबात त्रास देण्यामध्ये नणंद करिश्माचा मोठा हात आहे हे मयुरी जगतापच्या बोलण्यामधून सिद्ध झालं. पण भावांच्या संसारामध्ये लुडबूड करणारी, भावजयांना मारहाण करणारी ही करिश्मा नक्की आहे तरी कोण? याबबत सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. इतकंच काय तर करिश्माचा अनेक राजकीय मंडळींशी संबंध जोडले जात आहेत. करिश्मा फॅशन डिझायनर म्हणून काम करते. करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली होती. तिचा लक्ष्मीतारा नावाचा कपड्यांचा ब्रँडही आहे.

राजकीय मंडळींशी खास कनेक्शन
तसेच करिश्माचं कोथरुडमध्ये स्वतःचं दुकान असल्याचंही समोर आलं आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरण पेटलं असताना करिश्माचे काही राजकीय मंडळींबरोबरचे तिचे फोटो व्हायरल होत आहेत. सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांसारख्या राजकीय क्षेत्रातील मंडळींबरोबरचे तिचे फोटो समोर आले आहेत. यामुळे करिश्माचे राजकीय क्षेत्रातील या मंडळींशी घनिष्ठ संबंध होते का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हगवणे कुटुंबात पिंकी ताई म्हणून करिश्माला संबोधलं जात होतं. मात्र पिंकी ताईने दोन्ही हगवणे कुटुंबातील दोन्ही सूनांना तुच्छ वागणूक दिली. वैष्णवी हत्या प्रकरणातून एक स्त्रीच स्त्रीसाठी जीवघेणी ठरली हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.