Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणातील घडामोडींना वेग आला आहे. सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघंही बेपत्ता होते. हगवणे कुटुंबातील इतर सदस्यांना घटना घडल्यानंतर लगेचच पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलं. शिवाय वैष्णवीच्या दहा महिन्याच्या मुलालाही कस्पटे कुटुंबियांनी ताब्यात घेतलं. वैष्णवीच्या आई-वडिलांनी नातवाला सुखरुप घरी आणलं. मात्र त्यापूर्वी वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीच्या हाती होतं. कस्पटे कुटुंबिय जेव्हा या बाळाला आणायला गेले तेव्हा निलेशने बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावलं. निलेश विरोधातही आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेशने यापूर्वीही स्वतःच्या पत्नीबरोबरचे शारीरिक संबंध शूट केले होते. घाणेरडी विकृती असलेल्या या माणसाची काळी बाजू आता समोर आली आहे. निलेश नक्की कोण? हे सविस्तर जाणून घेऊया. (who is nilesh chavan)
फॅन, एसीमध्ये छुपा कॅमेरा
हगवणे कुटुंबियांशी घरोबा असलेल्या निलेश चव्हाणच्या नावे याआधीही काही गुन्हे दाखल आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, निलेश चव्हाणचं लग्न ३ जून २०१८ला झालं. संसार अगदी सुरळीत सुरु होता. मात्र निलेशच्या पत्नीला एक संशयास्पद बाब आढळली. बेडरुमच्या सिलींग फॅनला काहीतरी वस्तू दिसत असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. पत्नीला हा प्रकार काय आहे हे कळेनाच. तिने निलेशला या संदर्भात विचारलं. मात्र त्याने नको ती उत्तरं देत तिचं बोलणं फेटाळून लावलं. ही जानेवारी २०१९ची घटना होती. त्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी २०१९मध्ये पत्नीला बेडरुमच्या एसीला काहीतरी अडकवलं असल्याचं दिसलं.
आणखी वाचा – बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

पत्नीबरोबरचे शारीरिक संबंध शूट
पत्नीने निलेशला पुन्हा याबाबत चौकशी केली. मात्र त्याने आधीसारखीच उत्तरं देत बायकोला गप्प केलं. हे प्रकरण इथवरच थांबलं नाही. पत्नीच्या हाती निलेशचा लॅपटॉप आला. तिने पतीचा लॅपटॉप उघडला. लॅपटॉप उघडल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसलाच. निलेश व त्याच्या पत्नीमधील शारीरिक संबंधांचे व्हिडीओ लॅपटॉपमध्ये होते. दोघं शारीरिक संबंध ठेवायचे ते व्हिडीओ शूट होत होते. पत्नीसह शारीरिक संबंध ठेवताना तो बेडरुमची लाईटही बंद करायचा नाही. हे नेमकं कशासाठी होतं? हे समजल्यावर त्याच्या पत्नीच्या पायाखालची जमिनच सरकली. इतर महिलांबरोबरचे त्याचे असलेले शारीरिक संबंधही शूट करुन ठेवण्यात आले होते. निलेश यांच्या पत्नीने ते सगळे व्हिडीओ पाहिले. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार पत्नीला सहन झाला नाही. तिने नवऱ्याला याविषयी विचारलं. यावेळी निलेशने पत्नीला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली.
आणखी वाचा – सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन…; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप
पत्नीचाच छळ, सासरीही सत्य महिती असूनही
इतकंच काय तर तिच्याजवळील पैसे, दागिनेही काढून घेतले. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना आणखीनच अश्लीलतेचा कळस गाठणारी ठरली. जेव्हा निलेशच्या आई-वडिलांना तिने हे सगळं सांगितलं तेव्हा उलट तिचाच छळ करण्यात आला. छळ असह्य झाल्यानंतर २०२२मध्ये पत्नीने निलेशविरोधात तक्रार केली. सगळे आक्षेपार्ह व्हिडीओही दाखवले. पत्नीच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल झाला मात्र बहुदा राजकीय दबावामुळे निलेशला अटक झालीच नाही. शेवटी निलेश त्याच्या पत्नीपासून कायमचा लांब राहिला.