लोचन मजनू,गाणं पोपट, शिवालीचे बाबा, अशा अनेक भूमिकांमधून घरात घरात पोहचलेला महारष्ट्राचा लाडका हास्यविर म्हणजे समीर चौघुले.महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून आपल्या उत्तम विनोदाच्या टायमिंगने आणि अभिनयातील सहजतेने समीर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे. याच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळणाऱ्या समीरचा आज ५०वा वाढदिवस आहे.(Samir Choughule Birthday)
हास्यजत्रेतील कलाकारांच्या पडद्यावरच काम प्रेक्षकांच्या जितकं पसंतीस उतरत, तितकची पसंती या कलाकारांच्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगला देखील मिळते. या सगळ्या कलाकारांसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळीच देखील उत्तम बॉण्डिंग पाहायला मिळत.आणि आज समीरच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने समीरसाठी खास पोस्ट केली आहे.
प्राजक्ताची समीरसाठी खास पोस्ट (Samir Choughule Birthday)
समीर सोबतचा एक फोटो पोस्ट करत प्राजक्ताने त्याच्यासाठी खास असं कॅप्शन लिहलं आहे. त्यात प्राजक्ताने म्हंटल आहे,दुग्धशर्करा योग.. आषाढी एकादशीला तुझा ५०वा वाढदिवस आला. खरंच सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस.तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली.आणि मी ‘वाह दादा वाह’ फेम प्राजक्ता झाले.आणि ही ओळख आयुष्यभर राहील, असं वाटत.तू अतिशय कष्टाळू,नम्र,भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस.तुला आतापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरुवात ठरो..,आणि इथून पुढे देवाचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुवाधार बरसत राहो,ह्याच तुला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.प्राजक्ताच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी देखील त्या दोघांचं कौतुक केलं आहे.(Samir Choughule Birthday)

हास्यजत्रेत कलाकारांचे स्किट गाजले, त्यांच्या भूमिका गाजल्या. त्याचप्रमाणे प्राजक्ताला देखील नवीन ओळख मिळाली, तिची एक वेगळी बाजू या शो मधून प्रेक्षकांना बघायला मिळाली.तिच्या दाद देण्याचा ही आता एक ट्रेंड सेट झाला आहे.तिच्या वेगवेगळ्या लुक्सच देखील विशेष कौतुक होताना बघायला मिळत. अनेकदा स्किट मध्ये प्राजक्तावर देखील विनोद होताना पाहायला मिळतात.
हे देखील वाचा : ‘या’ कपड्यांमुळे का होते शिवाली ट्रोल?