Pakistani Person Viral Video : सध्या जगभरात भारत-पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीची चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण या घटनेबाबत आपापले मत मांडताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्याचा भारताने बदला घेत चांगलंच प्रतिउत्तर दिलं. मागील दोन दिवसांत हा वाद वाढत चालला आहे. आता पाकिस्तानी सैन्यानेही भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने वेळोवेळी पाडून लावले आहे. हा वाद चिघळत असताना आता पाकिस्तानी नागरिकही त्यांच्या देशाला जबाबदार ठरवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या पाकिस्तानी नागरिकांचे त्यांच्या देशाविरोधातील द्वेष उफाळून येताना दिसत आहे आणि भारताच्या शौर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
एका पाकिस्तानी नागरिकाने भारताचा जयजयकार करत त्यांच्या देशाला या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीला जबाबदार ठरवले. या ऑपरेशनचे पाकिस्तानी नागरिकाने कौतुक केलेले पाहायला मिळाले. अभय नाव असलेला आणि स्वतःला ‘पाकिस्तानी नागरिक’ म्हणवणारा एका इसमाने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. समोर आलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये, अभय सांगतो की, “मी पाकिस्तानी आहे आणि मी ते स्पष्ट सांगतो. भारताला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रथम, तुम्ही त्यांच्या लोकांवर हल्ला करता आणि जेव्हा ते प्रतिसाद देतात तेव्हा अचानक सर्वांना शांततेबद्दल, मानवी हक्कांबद्दल तुम्हाला आठवतं. पण जेव्हा २६ निष्पाप जीव गेले तेव्हा तीच ऊर्जा कुठे होती? आता जेव्हा भारताने प्रत्युत्तर दिले तेव्हा पाकिस्तान अचानक व्हिक्टिम कार्ड खेळत आहे”.
यापुढे अभय असेही म्हणाला आहे की, “भारत किवा पाकिस्तान दोघांनाही युद्ध नको आहे. पण जेव्हा तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालायला सुरुवात करता, तेव्हा तो तुमच्याकडे परत आल्यावर आश्चर्यचकित होऊ नका जेव्हा तुमचे लोक मारले जात नाहीत तेव्हा शांतीचा संदेश देणे सोपे असते. आणि शेवटी, हे भारताने कधीच सुरु केले नाही हे विसरु नका. त्यांनी फक्त प्रतिसाद दिला आणि माझ्या मते, ते युद्धाचे कृत्य नाही तो फक्त न्याय आहे”, असे म्हटले.
यापूर्वीही एका पाकिस्तानी नागरिकाने तेथील परिस्थिती सांगत त्यांच्या यंत्रणेला दोष दिला. आणि भारताने केलेल्या क्षेपणास्त्र ऑपरेशनचे भरभरुन कौतुक केले. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल शिकवली आहे. आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.