‘पारू’ मालिकेच्या आजच्या भागात पारूच्या वैजूमुळे म्हणजेच पारूच्या जनावरामुळे दिशाची चांगलीच फजिती होते. गणी व वैजू खेळत असतात तेव्हा चुकून वैजू बंगल्यात निघून येते. तर बंगल्याच्या आभार स्विमिंगपूल जवळ दिशा व दामिनी बोलत असतात. दिशांच्या डोळ्यांची लोगोसाठी निवड न झाल्याने ती आधीच रागाने लालबुंद झालेली असते. तितक्यात वैजू दिशाच्या पायाजवळ येते. दिशा त्या बकरीला पाहून घाबरते आणि अचानक तिचा तोल जात ती स्विमिंगपूलमध्ये पडते. त्यानंतर घरातील सगळीच मंडळी स्विमिंगपूल जवळ येत दिशाला बाहेर काढतात. (Paaru Serial Promo)
दिशा व दामिनी नक्की ते जनावर कोणाचं होतं हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करतात. त्यावेळेला गणी त्या वैजूला घेऊन जाताना त्यांना दिसतो. त्यांनतर दामिनी व दिशा वैजूचा बंदोबस्त करुन पारूला अद्दल शिकवण्याचं ठरवतात. अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नव्या प्रोमोमध्ये पारूची वैजू हरवलेली पाहायला मिळत आहे. पारूबरोबर सगळेचजण वैजूला शोधत असतात.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पारू घाबरून तिच्या बाबांना म्हणजेच मारुतीला सांगते, “वैजू कुठे गेली. वैजू मला इथे दिसत नाही आहे. ती इथेच तर होती”. त्यानंतर ती गणीला बाहेर जाऊन वैजूला शोधायला सांगते. आणि पारू स्वतः वैजूला शोधायला बंगल्यात जाते. मात्र बंगल्यात पारूला वैजू कुठेच दिसत नाही. पारूचा वैजूवर खूप जीव असतो. ती खूप घाबरते. रडत रडत ती आदित्यच्या खोलीत येते. तिथे आदित्य व प्रीतम दोघेही असतात. आदित्यला पारू म्हणते, “आदित्य सर वैजू सापडत नाही”. हे ऐकून प्रीतम व आदित्यलाही धक्का बसतो. तर पारू म्हणते, “वैजूला देवी आईने पाहिलं तर नसेल ना?”, असा प्रश्न आता पारूसमोर असतो.
नेमकी वैजू कुठे गेली हे कोणाला कळतंच नाही. तर त्यांच्या खोलीबाहेर दामिनी त्यांचं बोलणं ऐकत असते. दामिनी म्हणते, “आता पाहिजे तितकं शोधा, आता कितीही शोधलं तरी ती बकरी काही मिळणार नाही. आता ही गोड बातमी दिशाला जाऊन सांगावी लागणार”. त्यानंतर पारू, आदित्य, प्रीतम, मारुती, गणी सगळेच पारूच्या वैजूला बंगल्याच्या आवारात शोधत असतात. आता दामिनीच्या कारस्थानामुळे वैजूचं काही बरं-वाईट तर झालं नसेल ना?, वैजू नक्की कुठे गेली असेल हे पारू शोधून काढणार का?, अहिल्यादेवींना वैजूबद्दल कळेल तेव्हा काय होणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.