‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकामागोमाग मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या कथानकाच्या जोरावर ही मालिका रसिक प्रेक्षकांची आवडती मालिका ठरत आहे. इतकंच नव्हेतर या मालिकेतील पारू व आदित्यच्या जोडीवरही प्रेक्षक खूप प्रेम करत आहेत. मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारताना दिसत आहे. पारू या भूमिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. (Sharayu Sonawane Wedding Photos)
याआधी ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी या भूमिकेमुळे शरयू घराघरांत पोहोचली. सोशल मिडियावरही शरयू बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच शरयूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. शरयूने तिच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरयूने तिच्या लग्नसोहळ्यातील नवऱ्याबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत.
याआधी शरयूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या व जयंतच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने थेट तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केले आहेत. “३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत”, असं म्हणत तिने लग्नाचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत.
शरयूने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दोघांचा शाही लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शरयूने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. तर त्यावरील आकर्षक व नाजूक अशा डायमंडच्या दागिन्यांनी शरयूच्या लूकमध्ये अधिकच भर घातली. तर तिच्या नवऱ्याने म्हणजेच जयंतने पांढऱ्या रंगाचीच मॅचिंग अशी शेरवानी परिधान केली होती. दोघांचा हा लग्नातील शाही लूक विशेष चर्चेत आहे. शरयूच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.