Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अनुष्का पारूचा काटा काढण्याच ठरवते. तर आदित्यलाही मारेकरी घालून ठार जीवे मारण्याची सुपारी देते. मात्र आदित्यला मारताना सतत पारु मध्ये मध्ये येत असल्याने मारेकरी आदित्य पर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा अनुष्का पारुला बाजूला काढण्यासाठी तिच्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिक्स करायचं ठरवते. त्यानंतर बंगल्याच्या एका केअरटेकरच्या मदतीने अनुष्का पारूच्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळते. आदित्य, पारू आणि अनुष्का तिघेही बाहेर बसलेले असतात तेव्हा ते कोल्ड्रिंक्स पार्टी करायच ठरवतात.
बाहेर बसून तिघेही एकमेकांशी निवांत गप्पा मारत असतात. त्याच वेळेला अनुष्का कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळते आणि तो ग्लास केअरटेकरला पारूला द्यायला सांगते. कोल्ड्रिंक्स देता देता नानू गडबडीने पारुसाठी दारू मिक्स केलेला ग्लास अनुष्काला देतो आणि पारू व आदित्य नॉर्मल कोल्ड्रिंक्स पितात. त्यानंतर मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमो मध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमो मध्ये असं पाहायला मिळत आहे की, अनुष्काचा खरा चेहरा आता पारूसमोर आलेला आहे. पारूने अत्यंत चतुराईने अनुष्काकडून सत्य काढून घेतलं असल्याचे पाहायला मिळत आहे आणि अनुष्कानेच आखलेल्या या प्लॅनमध्ये अनुष्का अडकली असल्याचं दिसतंय.
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अनुष्का पारुसाठी दारू मिक्स केलेला ग्लास चुकून पिऊ लागते आणि त्यानंतर तिला नशा चढते. पारूच्या हे लक्षात येताच पारू तिच्याकडून सगळं काही सत्य काढून घेण्याचा निर्णय घेते. पारू अनुष्काला मुद्दाम विचारते की, तुमचं आदित्य सरांवर प्रेम आहे ना?. यावर अनुष्का सांगते, नाही माझं आदित्यवर प्रेम नाही. तेव्हा पारू तिला उलट प्रश्न करते की, मग तुम्ही आदित्य सरांबरोबर लग्न करायला का तयार झाला आहात?. हे ऐकल्यावर अनुष्का खुर्चीवरुन धडपडत उठते आणि म्हणते की, मी त्याच्याशी लग्न फक्त एक बदला घेण्यासाठी करत आहे. माझं काही त्याच्यावर प्रेम नाही’, हे ऐकल्यावर पारूला धक्काच बसतो.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, पारंपरिक दागिना घडवण्यासाठी गाठलं सोनाराचं दुकान, साधेपणाचं कौतुक
पारू सुद्धा मुद्दाम दारू प्यायला नाटक करत असते. मात्र पारूला अनुष्का कडून इतका मोठं सत्य कळालेलं असतं. आता पारू अनुष्का नेमका कसला बदला घेत आहे, अनुष्का नेमकी आहे तरी कोण?, या सगळ्या गोष्टींचा छडा लावणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.