पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याचा यामागाचा हेतू होता. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव असताना ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलं असल्याचं अधिकृतरित्या जाहिर करण्यात आलं. मात्र अजूनही भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु असताना भारतातील काही सैनिकांना वीरमरण पत्करावं लागलं. याचबाबत आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सीमेवर लढताना बिहारमधील भारतीय सैनिक रामबाबू सिंह शहीद झाले आहेत. सीमेलगत होणाऱ्या गोळीबारात रामबाबू यांना गोळी लागली. सोमवारी (१२ मे) रामबाबू यांना वीरमरण आलं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबिय व गावही दुःखाच्या सागरात बुडालं आहे. (Operation sindoor soldier martyred)
रामबाबू यांचे सासरे सुभाष चंद्र शर्मा यांनी संपूर्ण माहिती दिली. १० एप्रिल २०२५ला जम्मू-काश्मीर येथे रामबाबू सेवेसाठी रुजू झाले. सुभाष पुढे म्हणाले, “मी आणि माझी मुलगी एकत्र होतो. सोमवारी (१२ मे) दुपारी जवळपास दीड वाजता मला आर्मी हेडक्वार्टरमधून फोन आला. तुमच्या जावयाला गोळी लागली आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर शहीद झाले असल्याचं सांगण्यात आलं. लगेचच मुलीला याबाबत आम्ही काहीच सांगितलं नाही”.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
जोधपूरमध्ये रामबाबू यांना देशसेवेसाठी जायचं होतं. मात्र भार—पाकिस्तानमधील तणावामुळे त्यांना जम्मू आणि काश्मीर येथे देशसेवेसाठी जावं लागलं. १२ मेला सकाळी १० वाजता रामबाबू यांनी पत्नीसह फोनद्वारे संवाद साधला. तेव्हा सगळं काही ठीक होतं. मात्र अचानक ही दुःखद बातमी समोर आली. पाकिस्तान ड्रोन S-400 मिसाइल नष्ट करण्यादरम्यान रामबाबू यांना गोळी लागली.
आणखी वाचा – मुलगी झाली, बायको बाळंतपणातच गेली अन्…; तरीही सीमेवर भारतीय सैनिकाचा लढा, संसार उघड्यावर असूनही…
चार ते पाच महिन्यांपूर्वी अंजलीसह रामबाबू यांचं लग्न झालं होतं. पत्नी गरोदरही असल्याचं समोर आलं आहे. आज त्यांच्या गावी रामबाबू यांचं पार्थिव पोहोचणार आहे. रामबाबू यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. रामबाबू यांचे कुटुंबिय म्हणाले की, “पत्नीला अजूनही रामबाबू शहीद झाल्याचं सांगितलं नाही. सहा महिनेही लग्नाला झाले नाही आणि हे सगळं घडलं”. १२ मेला सकाळी रामबाबू यांनी पत्नीला जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांनी एक वचन दिलं होतं. संध्याकाळी पुन्हा फोन करेन असं ते पत्नीला म्हणाले होते. मात्र हे वचन अपूर्णच राहिलं.