छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखलं जातं.या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात.नुकतंच या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही फुलराणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या या भूमिकेतील लूक आणि “झगामगा मला बघा” या डायलॉगची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधूनच प्रियदर्शनी इंदलकर हिला खरी ओळख मिळाली.या शो मधील सर्वच कलाकारांमध्ये एक घनिष्ट मैत्री पाहायला मिळते. हे कलाकार नेहमी एकमेकांच्या कामाचं कौतुक करत असून त्यांची प्रत्येक पोस्ट आणि फोटो व्हायरल होतात. सध्या ओंकर राऊतने केलेल्या पोस्टची चर्चा सर्वत्र रंगली.(Priyadarshini Indalkar)

नेमकं काय म्हणाला ओंकार राऊत?
फुलराणी या चित्रपटाचं प्रमोशन प्रियदर्शनी जोरदार पद्धतीने करत आहे. नुकतच या चित्रपटातच प्रीमियर पार पडला. या वेळी अनेक कलाकारांसोबत हास्यजत्रेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळचा फोटो ओंकार राऊतने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत,अभिनंदन आणि शुभेच्छा प्रियदर्शनी,तू खूपच छान काम केलंस! सुबोध भावे आणि विक्रम गोखले साहेबांसमोर उभं राहून अस वागणं आणि अस काम करणं सोपं नाही पण तू ते लीलया पार पाडली आहे! मला तुझा खूप अभिमान आणि तुझ्यासाठी मी आनंदी देखील आहे! या प्रत्येक क्षणाचा आनंद घे !! असं म्हणत त्याने तिचं कौतुक केलं.
या पुढे देखील त्याने हॅशटॅग फुलराणी, हॅशटॅग मीसकोळीवाडा असे काही हॅशटॅग दिले आहेत. यासोबतच त्याने हॅशटॅग नो कॉंट्रोव्हर्सीज प्लिज आणि विक्रम गोखलेंसोबत बेलीडान्स केलास और क्या चाहिये!! असं म्हटलंय. तर त्यांच्या या पोस्टवर प्रियदर्शनीने थँक यु सो मच,हे स्क्रीन वर बघताना मलाही विश्वास बसत नव्हता आणि हो, लास्ट हॅशटॅग महत्वाचा अशी कमेंट केली.(Priyadarshini Indalkar)
====
हे देखील वाचा – अमिताभ बच्चन यांच्यामुळे या दोन जिवलग मित्रांमध्ये पडली फूट
====
प्रियदर्शनी आणि ओंकार राऊत यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. ते अनेक स्किटमध्ये देखील एकत्र पाहायला मिळतात. पण वनिताच्या लग्नामधील एका फोटोमुळे त्यांच्यात नेमकं काय शिजतंय याची चर्चा रंगली होती.तसेच ते दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं देखील म्हट्लं गेलं. तर त्यांच्या त्या फोटोवर अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर अभिंनदनाचा वर्षाव केला तर आता देखील केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी फुलराणी फुलराजा, तुमचं अभिंनदन अश्या कॉमेंट केल्या आहेत.