‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून सूरज चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाला. गेली ३-४ महिने सूरजला महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळालं आणि याची पोचपावती म्हणून यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरजने स्वत:चं नाव कोरलं. ट्रॉफी जिंकल्यावर सूरज सर्वात आधी जेजुरीच्या खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. यानंतर त्याने मोढवे गावात एन्ट्री घेतली. ‘बिग बॉस’ विजेत्या सूरजचं यावेळी सर्वांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं. ‘बिग बॉस’ जिंकल्यापासून सूरजची चांगलीच चर्चा सुरु आहे. सर्वत्र त्याचं जोरदार कौतुक सुरु आहे. अनेकजण त्याच्या भेटीगाठी घेत आहेत. (Nikki Arbaz Will Meet Suraj)
‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर आता त्याला भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सूरज हा बारामतीतील मोढवे गावचा आहे. त्याच्या मूळगावी त्याला भेटायला त्याचे चाहते येत आहेत. गर्दी करत आहेत. सूरजची अनेक चाहते मंडळी त्याला भेटायला जात आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातीलही अनेकांनी सूरजच्या गावी जाऊनही त्याची भेट घेतली. डीपी, वैभव, इरीना, जान्हवी या सर्वांनी सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली आहे. मात्र अजून पर्यंत निक्की व अरबाज हे सूरजच्या गावी गेले नव्हते. अशातच आता हे दोघेही त्याच्या गावी जाणार आहेत.

आणखी वाचा – मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा पहिला फोटो समोर, आहे खूपच गोड, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सूरजने नुकताच नवीन मोबाइल घेतला असून याद्वारे तो सर्वांच्या संपर्कात राहत आहे. अनेकजण त्याच्याशी व्हिडीओकॉलद्वारे संपर्क साधत आहेत. अशातच निक्कीने सूरजला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी तिच्याबरोबर अरबाजही होता. या दोघांनी सूरजशी व्हिडीओ कॉल केल्याचा स्क्रीनशॉट निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट केला आहे आणि यावर तिने “भावा लवकरच भेटू” असं म्हटलं आहे. त्यामुळे आता निक्की लवकरच सूरज चव्हाणची भेट घेणार असून या भेटीची सर्वजण वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – पृथ्वीक प्रतापच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष
दरम्यान, बिग बॉस मराठी संपल्यानंतर बाहेर येताच निक्कीने सूरज चव्हाणच्या गावी जाणार असल्याचे म्हटलं होतं. ‘इट्स मज्जा’लं दिलेल्या मुलाखतीत निक्की असं म्हणाली होती की, “मला त्याच्या गावी जायला आवडेल. गायी, म्हशी आणि बकऱ्यांबरोबर खेळायला आवडेल. कोंबड्या पकडायला मला आवडेल. कारण मीही एका गावामधून आलेली आहे. तर मला त्याच्याबरोबर गावी राहायला आवडेल”.