झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच आता अभिराम व श्वेताऐवजी अभिराम व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये एजे त्यांच्या पहिल्या पत्नीच्या फोटोला पाहून “तुमच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे मी पुन्हा एकदा लग्न करत आहे” असं म्हणतो. यानंतर एजेंच्या बाकी तीन सुना श्वेताला लग्नासाठी आवाज देत आहेत. मात्र लीला कोणत्या तरी अनोळख्या व्यक्तीचा फोन येतो आणि त्यांनी लीलाच्या बहिणीला किडनॅप केले असते. त्यामुळे तिच्या जीवाची धमकी देत ते लीलाला एजेंबरोबर लग्न करण्याविषयी सांगतात. त्याचबरोबर ते एजेंच्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच श्वेताला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायला सांगतात.
आणखी वाचा – समीर चौघुले सुरु करणार स्वत:चा कार्यक्रम, पोस्ट करत मोठी घोषणा, शोचं नाव आहे…
याप्रमाणे लीला श्वेताच्या मागून येऊन तिला बेशुद्ध करते आणि श्वेताची साडी स्वत: परिधान करून एजेंबरोबर ती लग्नाला उभी राहत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये लीला व एजे एकमेकांबरोबर सप्तपदी घेतानाचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण लग्नात लीलाच्या डोक्यावर पदर असल्यामुळे एजेंचं लग्न नक्की श्वेताशी होत आहे की लीलाशी? हे कुणालाच कळत नाही. पण एजेची आई लीलाच्या डोक्यावरुन पदर काढताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो.
दरम्यान, गेले काही दिवस लीला व एजेंच्या यांच्या लग्नावईषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता या नवीन प्रोमोमुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, एजे व लीला यांचे लग्न खरंच होणार की? यात आणखी काय नवीन तवसीत येणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.