कलाकार म्हटलं की त्यांना ऊन, वारा, पाऊस हे काही न पाहता त्यांना चित्रीकरण करावं लागतं. बरेचदा या कलाकारांना चित्रीकरणानिमित्त घराबाहेर रहावं लागतं. इतकंच नव्हे तर आठ दहा तासाच्या शिफ्टही पूर्ण कराव्या लागतात. विशेषतः बरं नसतानाही ही कलाकार मंडळी तेवढ्याच ताकदीने हे सर्व काही शूट करतात. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आणि कर्तव्य, जबाबदारी म्हणून ही कलाकार मंडळी बरं नसतानाही चित्रीकरणाला येतात. अशातच मराठी मालिकेतील एका लोकप्रिय चेहऱ्याला बरं नसल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (navri mile hitlerla Bts)
या पोस्टमध्ये मालिकेचा BTS शेअर केला आहे. नवरी मिळे हिटलरला मालिकेतील हा bts आहे. नवरी मिळे हिटलरला मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत सासू-सूनांचं अनोखं बॉण्डिंग यांत पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेतील दुर्गा म्हणजे अभिनेत्री शर्मिला शिंदे मालिकेतील एक bts शेअर केला आहे. यामध्ये तिच्या सासूबाई म्हणजेच लीला आजारी असल्याचं तिने म्हटलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दुर्गा झोपाळयावर झोका घेत बसली आहे. तर लीला अंगात ताप असताना आराम करत तिचा वेळ घालवताना दिसत आहे. आजारी आहेत आमच्या सासूबाई असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. वटपौर्णिमेच्या शुटपासूनचं लीला म्हणजेच वल्लरीची तब्येत ठीक नव्हती. तरीसुद्धा वल्लरीने आजरपणात चित्रीकरण पूर्ण केलं.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीतही वल्लरीने तिच्या आजारपणाबाबत भाष्य केलं. वल्लरी यावेळी म्हणाली, “तो दिवस खूप कठीण होता. मला ताप होता. आणि त्या भरजरी कपड्यांमध्ये, त्या लूकमध्ये मला शूट करायचं होतं. बरं नसल्याने मला ते सगळं करणं कठीण वाटत होतं. त्या दिवशी खूप गरम होतं होतं आणि त्यात मला ताप होता. पण सीन खूप छान झाला. ऑनस्क्रीन तो सीन खूप चांगला झाला”, असं म्हटलं.