महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लॉली या पात्राने कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. लॉलीच्या भूमिकेतून नम्रता रुद्राजने कमालीची लोकप्रियता मिळवली. नम्रता सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या लेकासोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नम्रताने नुकताच तिच्या लेकासोबतचा म्हणजे रुद्राजसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचे खास औचित्य म्हणजे आज रुद्राजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नम्रताने रुद्राजच्या फोटोसोबत खास कॅप्शन देत पोस्ट शेअर केलीय.(namrata sambherao)
पहा नम्रताने लेकासाठी काय केलंय पोस्ट (namrata sambherao)

यात तिने लिहिलंय, आज आमच्या बाळाचा वाढदिवस आम्ही दोघांनी ठरवलं थोडं जगून घेऊया थोडा वेळ जाऊदे मग चान्स घेऊया, जगलो हसलो रडलो भांडलो आता जरा आई बाप व्हायचा चान्स घेऊया, वाटलं एखादं लेकरू असावं. ज्याला कडेवर घेऊन मिरवावं, त्याने आई म्हणत उराशी बिलगावं…! एक मात्र मला कळून चुकलं, तुम्ही लेकरं आमच्या इच्छेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार आयुष्यात येता आणि आम्हा आई बापाच्या जगण्याला खरा अर्थ देता आणि मग स्वप्न आमचं पूर्ण झालं, उदरी माझ्या लेकरू आलं ..
====
हे देखील वाचा – सचिन गोस्वामींनी गायलेल्या गाण्यावर प्रसाद-चेतना थिरकले
====
त्याच्या येण्याने एक आवर्तन पूर्ण झालं. पूर्वी वाटायचं हा मला जीव लावेल का? मी कामावर गेले कि माझ्या मागे धावेल का? पण माझ्या शिवाय त्याच आता पान हलत नाही …मी कामाला गेले कि तुझ्याविना माझं मन रमत नाही … कधी कधी मनात खूप अपराधी भावना येते पण हे सगळं प्रत्येक आई आपल्या बाळा साठी च तर करते प्रत्येक वेळी त्याच्या आई ह्या हाकेने माझा उर भरून येतो. आई अंगाई म्हण ना ह्या वाक्याने कंठ माझा दाटून येतो.(namrata sambherao)
आई मी तुझ्या कुशीत झोपू म्हणजे मला झोप लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र माझी झोप उडते. मग त्याच्या कुशीत जाऊन कधी कधी मी एकटीच रडते. त्याच हसणं बघितलं कि आयुष्य माझं वाढतं. आणि एका गोड बाळाची आई म्हणून थोडं मूठभर मांस देखील चढतं. I LUBLU RUDRAAJ. नम्रताच्या या कॅप्शनवरून आईची माया अफाटच असते हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. खूप भावनिक शब्दात तिने आई बनल्यानंतरच्या विश्वाचे पदर उलगडलेत. नम्रताच्या या पोस्टवर स्पृहा वरद, रेश्मा शिंदे, सुकन्या कुलकर्णी, छाया कदम, अश्विनी कासार आदी कलाकारांनी रुद्राजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
